अकोल्यात श्रमिक पत्रकार संघाची स्थापना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 01:13 PM2019-09-02T13:13:53+5:302019-09-02T13:15:29+5:30

श्रमिक पत्रकार संघ, अकोला शाखेची सभा रविवारी दुपारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शेतकरी सदनात उत्साहात पार पडली.

Labor Journalist Association established in Akola! | अकोल्यात श्रमिक पत्रकार संघाची स्थापना!

अकोल्यात श्रमिक पत्रकार संघाची स्थापना!

Next


अकोला: महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संलग्नित श्रमिक पत्रकार संघ, अकोला शाखेची सभा रविवारी दुपारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शेतकरी सदनात उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र (नागपूर) होते. प्रमुख अतिथी म्हणून शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे माजी अध्यक्ष यदू जोशी (मुंबई), महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, माजी अध्यक्ष विश्वास इंदुरीकर, माजी सरचिटणीस विनोद देशमुख व ज्येष्ठ पत्रकार संदीप भारंबे उपस्थित होते.
प्रारंभी अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी, श्रमिक पत्रकार संघ अकोला शाखा कार्यकारिणी घोषित केली. यावेळी बोलताना मैत्र यांनी, येणारा काळ पत्रकारांसाठी आव्हानात्मक आहे. देशभरात वृत्तपत्र क्षेत्रातून दररोज पत्रकारांना पत्रकारिता सोडावी लागत आहे.
त्यामुळे प्रत्येकाने ज्ञान आणि तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे आणि चालत्या काळासोबत चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे सांगत, दरवर्षी आरोग्य सेवेसाठी गरजू पत्रकारांना २0 ते २५ लाख रुपयांची मदत देणारा, निवृत्त पत्रकारांना सन्मानजनक पेंशन देणारा, श्रमिक पत्रकार संघ देशातील एकमेव असल्याचे ते म्हणाले.


यदू जोशी यांनी, अकोल्यात श्रमिक पत्रकार संघ नव्हता, ही खंत वाटत होती; परंतु आता पत्रकार संघ अकोल्यात स्थापन झाल्यामुळे अकोला बदल रहा है...असे गौरवोद्गार काढत, ते म्हणाले, पत्रकारांना पेंशन, अधिस्वीकृती पत्रकार शिवशाही बसमध्ये मोफत प्रवासाचा निर्णय करून घेण्यात यश मिळाले. ही श्रमिक पत्रकार संघाची ताकद आहे. यावेळी ब्रह्माशंकर त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत शिंदे, विश्वास इंदुरीकर, विनोद देशमुख यांनी मनोगत व्यक्त करीत श्रमिक पत्रकार संघाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर, मोहन बोरगावकर व अ‍ॅड. संतोष भोरे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक राजेश शेगाकार यांनी केले. संचालन विशाल बोरे यांनी केले. आभार मनोज भिवगडे यांनी मानले.
 
या पत्रकारांचा झाला सन्मान
बाबा दळवी पुरस्कारप्राप्त पत्रकार सचिन राऊत, बापूजी अणे पत्रकारिता पुरस्कारप्राप्त गोपाल हागे, प्रबोध देशपांडे, रवींद्र लाखोडे, डॉ. शैलेंद्र दुबे व नितीन गव्हाळे यांचा मान्यवरांनी सन्मान केला.


अशी आहे कार्यकारिणी!
जिल्हाध्यक्ष-अजय डांगे, सचिव-दत्तात्रय(आशिष) गावंडे, उपाध्यक्ष-राजेश शेगाकार, मनोज भिवगडे, कोषाध्यक्ष-प्रबोध देशपांडे, सहसचिव-जीवन सोनटक्के, शरद पाचपोर, कार्यकारिणी सदस्य-नीलेश जोशी, हर्षवर्धन वाघ, गणेश सोनोने, शैलेंद्र दुबे, दिलीप ब्राह्मणे, निशाली पंचगाम, कपिल कसबे व गोपाल हागे.

Web Title: Labor Journalist Association established in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला