कृषी सेवा केंद्रातील कामगारांची शेतकऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:18 PM2019-06-28T12:18:58+5:302019-06-28T12:19:07+5:30
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग कृषी सेवा केंद्रातील दोन कामगारांनी एका शेतक ºयास फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली.
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग कृषी सेवा केंद्रातील दोन कामगारांनी एका शेतक ºयास फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी शेतकºयाने रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन कामगारांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
कीर्ती नगर येथील रहिवासी प्रताप शरदचंद्र देशमुख हे त्यांची दुचाकी बजरंग कृषी सेवा केंद्राच्या गोदामासमोर ठेवून बियाणे परमिट आणण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेले होते. परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या दुचाकीच्या टायरमधील हवा सोडलेली दिसली. त्यांनी बाजूलाच असलेल्या कामगारांना विचारणा केली असता बजरंग कृषी सेवा केंद्रात कामगार असलेल्या सत्यम ऊर्फ जयेश संजय पांढरे रा. लहान उमरी आणि ऋषिकेश ऊर्फ ऋषी दादाराव ताथोड रा. निंभोरा या दोघांनी देशमुख यांना बेदम मारहाण केली. फावड्याचा लाकडी दांडा व लोखंडी पाइपने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रताप देशमुख यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता शरीरातील हाडे मोडल्याचे समोर आले. त्यामुळे देशमुख यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.