निवडणुकीच्या रणधुमाळीत गावात स्वच्छतेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:16 AM2020-12-26T04:16:03+5:302020-12-26T04:16:03+5:30
गावात असलेल्या सांडपाणी नाली तुडुंब भरल्या आहेत.त्यामध्ये प्लॅस्टिक पाणी,काळी कचरा पडून त्या नालीत मध्ये अडकलेली आहे.परिणामी दुर्गनधी होऊन ...
गावात असलेल्या सांडपाणी नाली तुडुंब भरल्या आहेत.त्यामध्ये प्लॅस्टिक पाणी,काळी कचरा पडून त्या नालीत मध्ये अडकलेली आहे.परिणामी दुर्गनधी होऊन जनसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.तसेच तापाचे रुग्ण, किरकोळ आजार मध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.तरी ग्राम प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गावात असलेल्या चौकाचौकात असलेल्या काळी कचऱ्याचे ढीग उचलून नाल्या ची साफ सफाई करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.या सुविधाचा अभाव दिसल्याने जनसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.
गावात कचरा गाडी असून सुद्धा बऱ्याच ठिकाणी कचरा आढळून येत आहे.स्वच्छता तर दूर नाल्या सुद्धा साफसफाई झाली नाही.
- अंकुश शहाणे, सामाजिक कार्यकर्ते वाडेगाव
-गावातील नाल्याची साफ सफाई, आठवडी बाजार मध्ये असलेल्या घाणीचे साम्राज्य असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गनधी येते. हा पूर्ण परिसर ग्राम प्रशासनाने अधिकारी यांनी स्वच्छ करावा
- मोहम्मद अफतार उर्फ बब्बूभाई, माजी प स सदस्य वाडेगाव
फोटो