कोजागरीला दुधाचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:54 AM2017-10-05T01:54:08+5:302017-10-05T01:54:34+5:30
अकोला : दैनंदिन वापरापेक्षा उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात दुधाची मागणी प्रचंड वाढणार आहे. त्याचवेळी ही गरज भागवण्यास शासकीय दुध योजना असर्मथ ठरत आहे. बुधवारी दिवसभर इतर जिल्हा दुध संस्थांशी संपर्क साधल्यानं तरही तेथून पुरवठा होण्याची शक्यता मावळली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खासगी दुध उत्पादक संस्थांना बाजार खुला राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दैनंदिन वापरापेक्षा उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात दुधाची मागणी प्रचंड वाढणार आहे. त्याचवेळी ही गरज भागवण्यास शासकीय दुध योजना असर्मथ ठरत आहे. बुधवारी दिवसभर इतर जिल्हा दुध संस्थांशी संपर्क साधल्यानं तरही तेथून पुरवठा होण्याची शक्यता मावळली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खासगी दुध उत्पादक संस्थांना बाजार खुला राहणार आहे.
अकोला जिल्ह्यातील दुध उत्पादक संस्थांकडून उत्पादनात वाढ झाली असताना त्यांच्याकडून दुध घेण्यावर जिल्हा दुग्ध विकास अधिकारी कार्यालयाने निर्बंध लावले आहेत. तर त्याचवेळी यवतमाळ, अमरावती येथील शिल्लक राहणारे दुध अकोला जिल्ह्यात आणून विकले जात असल्याची परिस्थिती आहे. हाच प्रकार लक्षात घेता उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाची मागणी वाढणार आहे. हा अंदाज घेता जिल्हा दुग्ध विकास अधिकारी दुधाने यांनी लगतच्या जिल्ह्यांतून दुध पुरवठा होण्यासाठी संपर्क केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याच जिल्ह्याने पुरवठा करण्याबाबत होकार दिलेला नाही. त्यामुळे शासकीय दुग्ध संस्थेतून दुध मिळण्याची प्रतिक्षा करणारांना उद्या दुधापासून वंचित राहावे लागणार आहे. त्याचवेळी खासगी उत्पादक संस् थांच्या दुधाची विक्री मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.
जिल्ह्यात शासकीय दुध डेअरीकडून दररोज किमान १६00 लिटर दुधाचा पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकार्यांनी दिली. प्रत्यक्षात त्यामध्ये प्रचंड तफावत असल्याची माहिती आहे. अकोट, मूर्तिजापूर तालुक्यातील दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांकडून संकलित केलेले केवळ ७00 ते ८00 लिटर दुधाचे वाटपच दररोज केले जाते. त्यामध्ये यव तमाळ, अमरावती जिल्ह्यातून शिल्लक राहिलेले दुध अकोला जिल्ह्यात विक्रीसाठी बोलावले जाते, हा प्रकार जिल्ह्यात दैनंदिन झाला आहे. उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मागणीत वाढ होत असताना इतर जिल्ह्यातील दुध अकोल्यात विक्रीसाठी येणार नाही. त्याचवेळी जिल्ह्यातील संस्थांच्या दुधाचेही संकलन केले जात नाही, हा गंभिर प्रकार सुरू आहे. त्यातून शासकीय दूधावर विश्वास ठेवणार्या ग्राहकांना त्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.