मूर्तिजापूर शहरात स्वच्छतागृहांचा अभाव; महिलांची कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:30+5:302021-09-25T04:18:30+5:30
शहरात नगरपरिषदेची स्थापना काही काळ लोटला आहे; मात्र अद्यापही विकासकामांच्या दृष्टीने शहर मागासलेलेच असल्याचे चित्र आहे. शहरात स्वच्छतागृहांची संख्या ...
शहरात नगरपरिषदेची स्थापना काही काळ लोटला आहे; मात्र अद्यापही विकासकामांच्या दृष्टीने शहर मागासलेलेच असल्याचे चित्र आहे. शहरात स्वच्छतागृहांची संख्या फारच कमी असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नगर परिषदेने शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुले उभारली, परंतु व्यापारी, नागरिकांसाठी मूत्रीघरांची व्यवस्था केली नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी स्टेशन विभागातील जुनी वस्ती परिसरात व स्टेशन परिसरात असे दोनच ठिकाणी मूत्रीघर होते, परंतु कालांतराने मूत्रीघर जमीनदोस्त झाले आहेत.
------------------
शहरात घाणीचे साम्राज्य
शहरात स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने नागरिक उघड्यावर लघुशंका करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र घाण पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दखल घेऊन शहरात तत्काळ शहरातील मुख्य चौक व व्यापारी संकुल येथे स्वच्छतागृहांची निर्मिती करण्याची मागणी होत आहे.