लेडी हार्डिंग, मध्यवर्ती बसस्थानकात वॉटर कुलरची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:41+5:302021-04-20T04:19:41+5:30
अकोला : शहरातील जिल्हा महिला सामान्य रुग्णालय व मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याच्या ...
अकोला : शहरातील जिल्हा महिला सामान्य रुग्णालय व मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी वॉटर कुलर कार्यान्वित करण्यात आले. पक्षाने राबविलेल्या सामाजिक उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शहरातील जिल्हा महिला सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील रुग्ण दाखल होतात. यावेळी रुग्णालय परिसरात पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांनाही स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता या दोन्ही ठिकाणी वॉटर कुलरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांचा हस्ते वॉटर कुलरचे लोकार्पण करण्यात आले. यासाठी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी निधी उपलब्ध करून दिला. याप्रसंगी सय्यद युसूफ अली, माजी गटनेता मनोज गायकवाड, नगरसेविका उषा विरक, नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर, नितीन झापर्डे, माजी नगरसेवक अफसर कुरैशी, दिलीप देशमुख, संतोष डाबेराव, विधी विभाग जिल्हाध्यक्ष रविकांत ठाकरे, देवानंद ताले, बुढन गाडेकर, रवी गीते, अजय मते, पवन महल्ले, याकुब पहेलवान, संदीप तायडे, गोविंद पांडे, विजय वाघ,
अनंत वानखड़े, प्रकाश सोनोने, अरुण गुर्जर, अमित खांडेकर, पवन शर्मा, धर्मेंद्र शिरसाट, मिलिंद गवई, प्रकाश खंडारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.