सोयाबीनला ‘लक्ष्मी’ पावली; ११ हजारांवर भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:23 AM2021-09-14T04:23:08+5:302021-09-14T04:23:08+5:30

रवी दामोदर अकोला : लाडक्या बाप्पांपाठोपाठ गौराईचे रविवारी घरोघरी आगमन झाले. सोनियाच्या पावलांनी ज्येष्ठागौरी घरी आली असून, शेतकऱ्यांना पावली ...

‘Lakshmi’ to soybeans; Price over Rs 11,000 | सोयाबीनला ‘लक्ष्मी’ पावली; ११ हजारांवर भाव

सोयाबीनला ‘लक्ष्मी’ पावली; ११ हजारांवर भाव

Next

रवी दामोदर

अकोला : लाडक्या बाप्पांपाठोपाठ गौराईचे रविवारी घरोघरी आगमन झाले. सोनियाच्या पावलांनी ज्येष्ठागौरी घरी आली असून, शेतकऱ्यांना पावली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनचा भाव खुलला असून, सोमवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सोयाबीनला तब्बल ११ हजार ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. पातूर तालुक्यातील अतुल भीकाजी घायवट (रा. जांब) या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने सात पोती सोयाबीन विक्रीला आणले होते. त्यांच्या सोयाबीनला ११ हजार ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. मागील गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला आहे. दरवर्षी अतिवृष्टी, कीड, अळींचा प्रादुर्भाव यांसारखी नैसर्गिक संकटामुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र होते. दरम्यान, यंदा सोयाबीनच्या भावाने मागील गेल्या सर्व वर्षांचे रेकॉर्ड तोडले असून, उच्चांकी भाव मिळाला आहे.

तीन दिवसानंतर अकोला बाजार समिती उघडली, सोमवारी बाजार समितीमध्ये काही मोजक्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणल्याचे दिसून आले. यामध्ये पातूर तालुक्यातील अतुल घायवट या शेतकऱ्यास तब्बल ११ हजार ५०१ रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू खुलले होते.

-----------------------------------------

रेकॉर्ड ब्रेक भाव

जिल्ह्यात ज्यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी करणे सुरू केले, त्या वर्षापासून यंदा सोयाबीनच्या भावाने उच्चांक गाठल्याचे बाजार समित्याच्या अडत्यांनी सांगितले. येणाऱ्या एक ते दीड महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येणार असून, भावाने उच्चांक गाठल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे.

--------------------------

शेतकऱ्याचे झाले स्वागत

अकोला बाजार समितीत नवीन सोयाबीन दाखल झाले असून, सोयाबीनला अच्छे दिन आल्याचे दिसून आले. सोयाबीनच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. यावेळी बाजार समितीत नवीन सोयाबीन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याचे स्वागत करण्यात आले.

--------------------------

-------- हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी

जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली असून, खरीप हंगामात जिल्ह्यात ----------- हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील काही भागात अतिपावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे, तर काही भागात सोयाबीनचे शिवार फुलल्याचे चित्र आहे.

--------------------------------

Web Title: ‘Lakshmi’ to soybeans; Price over Rs 11,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.