पाच महिन्यात पहिल्यांदाच धावली लालपरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:00 AM2020-08-21T11:00:32+5:302020-08-21T11:00:40+5:30

सायंकाळपर्यंत एसटीने प्रवाशांच्या सेवेत ५५ पेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण केल्या.

Lalpari ran for the first time in five months! | पाच महिन्यात पहिल्यांदाच धावली लालपरी!

पाच महिन्यात पहिल्यांदाच धावली लालपरी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून थांबलेली एसटीची चाके गुरुवारी पुन्हा एकदा धावली; मात्र पहिल्याच दिवशी लालपरीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला त्यामुळे सहाजीकच उत्पन्न कमी झाले असल तरी सायंकाळपर्यंत एसटीने प्रवाशांच्या सेवेत ५५ पेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण केल्या.
पाच महिन्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या आंतर जिल्हा प्रवासाला सुरवात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गुरुवारी सकाळीच जिल्ह्यासह तालुकास्तरावरून एसटी बसेस सोडण्यात आल्या. पहिल्या दिवशी एसटी बसच्या प्रवासाला प्रवाशांचा प्रतिसाद दिसला नाही. अकोला मध्यवर्ती बसस्थानकातून गुरुवारी सकाळीच पहिली बस अकोटसाठी सोडण्यात आली. त्या पाठोपाठ शेगाव, अमरावती, दर्यापूर या ठिकाणीही बस सोडण्यात आल्यात. तालुकास्तरावरूनही एसटी बस सोडण्यात आल्या; मात्र प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजतापर्यंत ५५ पेक्षा जास्त बस फेºया झाले असून उत्पन्न नाममात्र असल्यची माहिती एसटी महामंडळाने दिली.


पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा जास्त प्रतिसाद मिळाला नाही. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास एसटीचा प्रवास पूर्ववत सुरू होईल. शिवाय बस फेºयाही वाढविण्यात येतील.
- चेतना खिरवाडकर,
विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, अकोला विभाग

 

Web Title: Lalpari ran for the first time in five months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.