रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:52+5:302021-02-26T04:25:52+5:30
मूर्तिजापूर : विनापरवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॕॅक्टर तलाठ्याने जप्त करून तहसील कार्यालयात उभा केला; मात्र तहसील प्रांगणातून ट्रॕक्टर ...
मूर्तिजापूर : विनापरवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॕॅक्टर तलाठ्याने जप्त करून तहसील कार्यालयात उभा केला; मात्र तहसील प्रांगणातून ट्रॕक्टर मालकाने तो विनापरवाना परस्परच लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणात तहसीलदार प्रदीप पवार यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सांगवी-कौलखेड जहाँगीर रस्त्यावर रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन तलाठी एस.एस.सोनोने व त्यांच्या पथकाने कडून सकाळी ६.१५ वाजता जप्त केले. वाहन तहसील कार्यालयात उभे करण्यात आले. वाहन मालकाने परवानगी न घेता वाहन (१ ब्रास रेतीसह) तहसील कार्यालय परीसरातून परस्पर लंपास केले. या प्रकरणी तहसीलदार प्रदीप पवार यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक राधाकिसन सोळंके (रा.सांगवी) यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.