चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:18 AM2017-08-03T02:18:04+5:302017-08-03T02:19:55+5:30
वाशिम : अकोला-हैद्राबाद या १६१ क्रमांकाच्या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाशिम जिल्ह्यातील ९७ किलोमीटर रस्त्यालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. याबाबत भारत सरकारचे राजपत्र १ आॅगस्ट रोजी जारी झाले असून, संबंधित शेतकºयांना २१ आॅगस्टपर्यंत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वाशिम यांच्या कार्यालयाकडे आक्षेप नोंदविता येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला ते हैदराबाद या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर रस्ता रूंदीकरण, चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी रस्त्यालगतची जमीन संपादन करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मेडशी गावापासून ते हिंगोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या राजगाव या दरम्यानच्या गावातील शेतकºयांची रस्त्यालगतची जमीन संपादीत केली जाणार आहे. सदर जमिनीच्या संदर्भात जमीन मालक किंवा जमिनीशी हितसंबंध असणाºया व्यक्तिला काही शंका किंवा आक्षेप असेल तर २१ आॅगस्टपर्यंत वाशिम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात हरकत किंवा आक्षेप नोंदविता येणार आहेत.
तथापि, सर्व हरकती ऐकून घेतल्यानंतर आणि काही प्रकरणात चौकशी आवश्यक असल्यास सक्षम प्राधिकरणामार्फत चौकशी केली जाईल.
चौकशीअंती हरकती स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा आदेश जारी करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणास देण्यात आले आहेत. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला आदेश हा अंतिम राहणार आहे. हरकती व आक्षेपांचे निरासरण केल्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या महामार्गालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे.
अकोला-हैदराबाद राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासंदर्भात संबंधित शेतकºयांना काही आक्षेप किंवा हरकती नोंदविता येणार आहेत. कुणाला काही आक्षेप असल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय वाशिम येथे लेखी स्वरुपात हरकती नोंदवाव्यात.
- अभिषेक देशमुख, उपविभागीय अधिकारी, वाशिम.
-