जिल्ह्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार घसरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:24 AM2021-08-24T04:24:01+5:302021-08-24T04:24:01+5:30

संतोष येलकर अकोला : शासनाच्या परिपत्रकानुसार जिरायत क्षेत्रासाठी दोन एकरपेक्षा कमी आणि बागायत क्षेत्रासाठी ४० आरपेक्षा कमी क्षेत्राच्या ...

Land sales in the district fell! | जिल्ह्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार घसरले !

जिल्ह्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार घसरले !

Next

संतोष येलकर

अकोला : शासनाच्या परिपत्रकानुसार जिरायत क्षेत्रासाठी दोन एकरपेक्षा कमी आणि बागायत क्षेत्रासाठी ४० आरपेक्षा कमी क्षेत्राच्या शेतजमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच ‘ले आऊट’ केल्याशिवाय गुंठेवारी क्षेत्रातील जागांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकत नसल्याने गेल्या महिनाभरापासून सह. जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयअंतर्गत जिल्ह्यातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार घसरले आहेत.

जमिनीचे तुकडे पाडण्यासंदर्भात प्रतिबंध करण्याबाबत आणि त्याचे एकत्रिकरण करण्यासंदर्भात (सुधारणा ) अधिनियमांतर्गत शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांमार्फत १२ जुलै २०२१ रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले. त्यानुसार जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रमाणभूत क्षेत्रानुसार जिरायत क्षेत्रासाठी दोन एकरपेक्षा कमी शेतजमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार करता येत नाही. तसेच बागायत क्षेत्राच्या ४० आर क्षेत्रापेक्षा कमी शेतजमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार करता येणार नाही. यासोबतच ‘ले आऊट’ केल्याशिवाय गुंठेवारी क्षेत्रातील जागांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर गत महिनाभरापासून सह. जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत होणारे जिल्ह्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार घसरले आहेत.

गुंठेवारी क्षेत्रातील व्यवहारासाठी

सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक!

यापूर्वी बांधकाम प्रयोजनासाठी गुंठेवारी क्षेत्रातील एक किंवा दोन गुंठे क्षेत्राच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. आता मात्र शासनाच्या परिपत्रकानुसार ‘ले आऊट’ असल्याशिवाय गुंठेवारी क्षेत्रातील जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकत नाहीत. मात्र जिल्हाधिकारी व संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकतील.

खरेदी-विक्रीचे व्यवहार

५० टक्के झाले कमी!

जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर प्रतिबंध करण्यात आल्याने गेल्या महिनाभरात जिल्ह्यात शेतजमीन व जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास ५० टक्क्याने कमी झाले, अशी माहिती सह. जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

शासनाच्या परिपत्रकानुसार जिरायत क्षेत्रातील दोन एकरपेक्षा कमी जमिनीचे तसेच बागायत क्षेत्रातील ४० आरपेक्षा कमी जमीन क्षेत्राचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यासोबतच ‘ले आऊट’ केल्याशिवाय गुंठेवारी क्षेत्रातील जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकत नाहीत. जिल्हाधिकारी किंवा संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने या क्षेत्रातील व्यवहार होऊ शकतील. त्यानुषंगाने गत महिनाभरापासून जिल्ह्यातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास ५० टक्के कमी झाले आहेत.

- डी. एस. भोसले

सह. जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी

Web Title: Land sales in the district fell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.