धान्य गोदाम फोडणारी मोठी टोळी जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 10:42 AM2020-07-15T10:42:11+5:302020-07-15T10:43:02+5:30

शासकीय धान्य गोदाम फोडून त्यामधील सुमारे २० लाख रुपयांचे धान्य चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी यश आले.

Large gang of thieves who breaks grain warehouse arrested | धान्य गोदाम फोडणारी मोठी टोळी जेरबंद!

धान्य गोदाम फोडणारी मोठी टोळी जेरबंद!

Next

अकोला : बाळापूर तसेच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर असलेले शासकीय धान्य गोदाम फोडून त्यामधील सुमारे २० लाख रुपयांचे धान्य चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी यश आले. या टोळीतील १२ चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आणखी काही चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या चोरट्यांकडून सुमारे १७ लाख ८८ हजार रुपयांचे धान्य जप्त करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तसेच शासकीय धान्य गोदामातून तूर, सोयाबीन व हरभरा यासह विविध धान्यांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याच्या तक्रारी बाळापूर तसेच बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. तीन ठिकाणी धान्याची चोरी झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या चोरट्यांच्या शोध सुरू केला.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या दोन पथकाने धान्य चोरी करणाºया टोळीतील विश्वनाथ किसन चौके (३९ रा. आशादुधा, ता. खामगाव), ज्ञानदेव त्र्यंबक बघे (४५ रा. तिंत्रव, ता. शेगाव), विठ्ठल पंजाबराव मेहेंगे (रा. अंबर हॉटेलमागे, शेगाव), गजानन हरिभाऊ कोठारे (२२ रा. तिंत्रव, ता. शेगाव), निवृत्ती राम घटे (३५ वर्ष रा. तिंत्रव, ता. शेगाव), श्रीकृष्ण गजानन करंगळे (२२ रा. तिंत्रव, ता. शेगाव), श्रीधर तुळशीराम पठाण (४१ रा. अटाळी, ता. खामगाव), आकाश विकास बिल्लेवार (२९ रा. धोतर्डी, ता. अकोला), किसना दयाराम भगेवार (२२ रा. बोरी अडगाव, ता. खामगाव), नीलेश प्रकाश बघे (३३ रा. धोतर्डी, ता. अकोला), छगन पुंजाजी बघे (३३ रा. धोतर्डी, ता. अकोला), श्याम भिगराव सैरिसे (२९ रा. धोतर्डी, ता. अकोला) या १२ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बोरगाव मंजू आणि बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ६ लाख रुपये किमतीची ११५ क्विंटल तूर, ६६ हजार रुपये किमतीचे २२ क्विंटल सोयाबीन, १ लाख रुपये किमतीचा २५ क्विंटल हरभरा, तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने, एक दुचाकी असा एकूण १७ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे, दत्तात्रय ढोरे, शक्ती कांबळे, किशोर सोनोने, मनोज नागमते, संदीप काटकर, वसीम शेख, संदीप ताले, गीता अववार, संजय निखाडे, अनिल राठोड, शैलेश ठाकरे, ओम देशमुख आणि गणेश सोगाने यांनी केली.


चोरट्यांच्या टोळीचे तीन जिल्ह्यात जाळे!
धान्य चोरणाºया या टोळीचे चोरीचे तीन जिल्ह्यात जाळे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार या चोरट्यांनी अकोल्यासह वाशिम, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात चोºया केल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. त्यामुळे या चोरट्यांकडून आणखी मोठ्या चोºया उघडकीस येण्याची शक्यता आहे. या चोरट्यांच्या टोळीला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Large gang of thieves who breaks grain warehouse arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.