कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:39 AM2017-09-22T01:39:40+5:302017-09-22T01:40:19+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ४२ शेतकर्यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरले असून, कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत असल्याने, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवार अखेरचा दिवस आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ४२ शेतकर्यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरले असून, कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत असल्याने, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवार अखेरचा दिवस आहे.
सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांना दीड लाख रुपयांपर्यंंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याचे काम गत २४ जुलैपासून जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर सुरू आहे. २१ सप्टेंबरपर्यंंंत जिल्हय़ात १ लाख ३६ हजार ४२ शेतकर्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत यापूर्वी १५ सप्टेंबरपर्यंंंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कर्जमाफीचे अर्ज भरण्यास शासनाकडून सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुषंगाने कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस शुक्रवार, २२ सप्टेंबर आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकर्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
अर्ज भरलेल्या शेतकर्यांच्या याद्यांचे होणार चावडी वाचन!
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्यांच्या गावनिहाय याद्या तयार करण्यात येणार आहेत. या शेतकरी याद्यांचे गावनिहाय चावडी वाचन करण्यात येणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.
२ लाख ४४ हजार शेतकर्यांच्या अर्जांंंची नोंदणी!
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २१ सप्टेंबर या कालावधीत २ लाख ४४ हजार ८३0 शेतकर्यांच्या अर्जांंंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३६ हजार ४२ शेतकर्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले.