हजारोंच्या उपस्थितीत कुसुमताईंना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:31 AM2017-10-31T01:31:52+5:302017-10-31T01:32:05+5:30
अकोला : डॉ. कुसुमताई कोरपे यांना मोहता मिल स्मशानभूमीमध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, खासदार संजय धोत्रे, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार तुकाराम बिरकड, दाळू गुरूजी, डॉ.जगन्नाथ ढोणे, बबनराव चौधरी यांचेसह सहकार व राजकारणासोबतच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डॉ. कुसुमताई कोरपे यांना मोहता मिल स्मशानभूमीमध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, खासदार संजय धोत्रे, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार तुकाराम बिरकड, दाळू गुरूजी, डॉ.जगन्नाथ ढोणे, बबनराव चौधरी यांचेसह सहकार व राजकारणासोबतच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कुसुमताई कोरपे यांचा जन्म १९ ऑगस्ट १९२८ रोजी स पकाळ कुटुंबात झाला. त्या काळातील अकोल्यातील नामवंत कायदेपंडित व राजकीय पुढारी अँड. श्रीधर गोविंद सपकाळ हे त्यांचे वडील होत. त्यांचे ज्येष्ठ बंधू माजी मंत्री स्व. नीळकंठ श्रीधर उपाख्य नानासाहेब सपकाळ हे सुप्रसिद्ध वकील आणि सहकार नेते होते. कुसुमताई यांचे माहेर व सासर हे दोन्ही घराणे समाजसेवेचा वसा घेतलेलेअसल्यामुळे त्यांचाही पिंड समाजसेवेचा बनला.
सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा विद्यार्जनाकडे राहिला. विवाहानं तरही त्यांनी विद्यार्जन चालू ठेवून एम. ए. ची पदवी संपादन केली. नागपूर विद्यापीठाने ‘विदर्भातील २0 व्या शतकातील ग्रामीण नेतृत्वाचा विकास’ हा त्यांचा शोधप्रबंध स्वीकारून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. समाजसेवेला ज्ञानाची जोड मिळाल्यामुळे त्यांचे राजकीय, सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातील समाजकार्य प्रभावी राहिले. १९५७ ते १९६७ या दहा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक समाजोपयागी कार्ये केली. मूर्तिजापूर मतदार संघातून त्या दोन वेळा आमदार राहिल्या आहे त. जिल्हय़ातील पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. विधानसभेत त्यांनी आपल्या मतदारसंघातील व जिल्हय़ातील जनसामान्यांच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांना वाचा फोडली. सिलिंग व कुळकायदा याबाबतचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय राहिले आहे. महाराष्ट्र को-ऑप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लि. मुंबई या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील राज्यस्तरावरील संस्थेवर त्या संचालिका म्हणून राहिल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्था व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या आजीव सदस्य होत्या. राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावर तानाच आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी व आदर्श माता या भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यांची दोन मुले व तीन मुली वैद्यकशास्त्रात उच्च विद्याविभूषित होऊन मानवी शुश्रूषेच्या पवित्र कार्यात व्र तस्थ आहेत.
भाजपतर्फे श्रद्धांजली
राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात अग्रगण्य माजी आमदार श्रीमती कुसुमताई कोरपे यांना भाजपच्यावतीने पक्ष कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे ,आ. हरीश पिंपळे, तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, सभापती बाळ टाले, सभागृहनेत्या गीतांजली शेंगोकार, सुमनताई गावंडे, डॉ. विनोद बोर्डे, डॉ. किशोर मालोकार, शीलाताई खेडकर, अनिल गावंडे, डिगंबर गावडे, संतोष वाकोडे, अंबादास उमाळे, विठ्ठल चतरकर, गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा आदी उपस्थित होते.