तीन महिन्यांत अकोला जिल्ह्यात २८ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 02:15 PM2019-01-28T14:15:44+5:302019-01-28T14:15:53+5:30

अकोला : नापिकी आणि थकीत कर्जामुळे जिल्ह्यात गत तीन महिन्यांच्या कालावधीत २८ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे वास्तव समोर येत आहे.

In the last three months, 28 farmers commited suiside in Akola district | तीन महिन्यांत अकोला जिल्ह्यात २८ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

तीन महिन्यांत अकोला जिल्ह्यात २८ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

Next

- संतोष येलकर
अकोला : नापिकी आणि थकीत कर्जामुळे जिल्ह्यात गत तीन महिन्यांच्या कालावधीत २८ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे वास्तव समोर येत आहे.
पावसातील खंड आणि जमिनीत ओलावा कमी असल्याने जिल्ह्यात खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. गत ३० आॅक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील सर्व गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळातील गावांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नापिकीमुळे शेतकरी संकटात सापडला असतानाच गत २५ आॅक्टोबर ते २५ जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत नापिकी आणि थकीत कर्जामुळे जिल्ह्यात २८ शेतकºयांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासन-प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनांचा गवगवा करण्यात येत असला तरी, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मात्र वाढतच असल्याचे वास्तव समोर येत आहे.

 
शेतकरी आत्महत्यांचे असे आहे वास्तव!
महिना                                  आत्महत्या
आॅक्टोबर                               ०३
नोव्हेंबर                                   १५
डिसेंबर                                     ०८
जानेवारी                                    ०२
................................................
एकूण                                         २८



‘या’ शेतकºयांनी संपविली जीवनयात्रा!
अकोला तालुका : माझोड- अन्नपूर्णा सहदेव तलगोटे, भौरद- नागेश विष्णू विसावे, धोतर्डी- शंकर शिवराम मोहाडे, गांधीग्राम- शेख उमर मन्नान व त्यांची पत्नी नजमाबी शेख उमर, चांदूर- माणिक श्रीराम बंड, कासली बु.- अनंता शांताराम काळमेघ, उगवा- महादेव हरिभाऊ उपराटे, म्हातोडी- अशोक महादेव गोरले, चिखलगाव- संजय पुंडलिक इंगळे.
बार्शीटाकळी तालुका: भेंडगाव- अनिल भीमराव पाटील, पिंपळगाव हांडे- उकंडा रामचंद्र गिºहे, महान- साबीरबेग मिर्झा नासिरबेग.
अकोट तालुका: खैरखेड- गोवर्धन किसन सावंग, खापरवाडी- मधुकर महादेव वाघमारे, मार्डी खटकाली- देवीदास श्रीराम डोंगरे, अकोलखेड- दामोदर श्रीराम कावरे, अकोलखेड- मनोज रामकृष्ण शेंडे, उमरा- दिलीप लक्ष्मण भोंडे, उमरा- मनाबाई बोंद्राजी दुरतकार.
मूर्तिजापूर तालुका : शेलू नजीक- आकाश सुधीर खांडेकर, सिरसो- मयूर सुनील मोंढे, वीरवाडा- जितेंद्र नारायण गवई.
तेल्हारा तालुका: कोठा- भगवान ओंकार हेरोडे, रायखेड- दयाराम ज्योतीराम तायडे, पिवंदळ खुर्द- मनोरमा माणिकराव तळोकार, बाळापूर तालुका: निंबी- पाडुरंग जयराम गव्हाळे, देगाव- राजेश सुखदेव वरोकार.
पातूर तालुका: सावरखेड- पूजाराम उत्तम चोंडकर.

२४ प्रकरणे मदतीसाठी पात्र!
शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्यासंदर्भात २४ जानेवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत गत तीन महिन्यांतील शेतकरी आत्महत्यांच्या २८ प्रकरणांपैकी २४ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, उर्वरित चार शेतकरी आत्महत्या प्रकरणात फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.


नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या!
गत २५ आॅक्टोबर ते २५ जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २८ शेतकºयांनी आत्महत्या केली. त्यामध्ये सर्वाधिक १५ शेतकरी आत्महत्या नोव्हेंबर महिन्यात झाल्या. त्याखालोखाल डिसेंबर महिन्यात आठ शेतकरी आत्महत्या झाल्या.

थकीत कर्जामुळे १५ आत्महत्या

शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले आहे; परंतु कर्जमाफीतही गत महिन्यात जिल्ह्यात थकीत कर्जामुळे १५ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे कर्जमाफी योजना थकबाकीदार शेतकºयांसाठी बिनकामाची ठरल्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

 

Web Title: In the last three months, 28 farmers commited suiside in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.