शिक्षकांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 02:27 PM2019-12-31T14:27:05+5:302019-12-31T14:27:18+5:30
शिक्षक मतदारांची अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली.
अकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील शिक्षकांची अंतिम मतदार यादी सोमवार, ३० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. शिक्षक मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील ५ हजार ६६३ शिक्षक मतदारांचा समावेश आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात गत २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत शिक्षकांची मतदार नोंदणी करण्यात आली. मतदार नोंदणीनंतर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिक्षकांच्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील ५ हजार ६६३ शिक्षक मतदारांचा समावेश आहे.