अकोला मनपाच्या उत्तर झोनचे कर्मचारी लेटलतीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:15 AM2018-02-08T02:15:07+5:302018-02-08T02:15:20+5:30

अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी सकाळी उत्तर झोनमधील कार्यालयाची आकस्मिक पाहणी केली असता मालमत्ता कर वसूल विभाग, जलप्रदाय विभागासह चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी कार्यालयात उशिरा हजेरी लावत असल्याचे आढळून आले. संबंधित लेटलतीफ कर्मचार्‍यांची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त वाघ यांनी उत्तर झोन कार्यालयातील हजेरी पुस्तक ताब्यात घेतले असून, कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले आहेत. 

LateTitif, employee of North Zone, Akola Municipal | अकोला मनपाच्या उत्तर झोनचे कर्मचारी लेटलतीफ

अकोला मनपाच्या उत्तर झोनचे कर्मचारी लेटलतीफ

Next
ठळक मुद्देआयुक्तांनी घेतली झाडाझडती; हजेरी पुस्तक ताब्यात घेतले! 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी सकाळी उत्तर झोनमधील कार्यालयाची आकस्मिक पाहणी केली असता मालमत्ता कर वसूल विभाग, जलप्रदाय विभागासह चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी कार्यालयात उशिरा हजेरी लावत असल्याचे आढळून आले. संबंधित लेटलतीफ कर्मचार्‍यांची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त वाघ यांनी उत्तर झोन कार्यालयातील हजेरी पुस्तक ताब्यात घेतले असून, कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले आहेत. 
महापालिकेच्या आस्थापनेवर २ हजार २00 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. २0१२ मध्ये अकोलेकरांच्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी झोन कार्यालयांचे गठन करण्यात आले. 
त्यासाठी क्षेत्रीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. झोन कार्यालयांमध्ये दैनंदिन साफसफाई, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था तसेच मालमत्ता कर वसुली विभागाचे कामकाज पार पडते. या कार्यालयांमध्ये कर्मचारी खरोखर कितपत हजेरी लावतात, याची कोणतीही तपासणी होत नसल्यामुळे झोन कार्यालयांचे कामकाज ढेपाळल्याची परिस्थिती आहे. बुधवारी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी उत्तर झोनचे सभापती मोहम्मद नौशाद यांच्या प्रभागातील समस्यांची पाहणी केली. 
त्यानंतर सकाळी १0.१५ वाजता उत्तर झोन कार्यालयाची आकस्मिक पाहणी केली असता, ११ वाजेपर्यंत मालमत्ता कर वसूल विभाग, जलप्रदाय विभागाचे कर्मचारी कार्यालयात हजर झाले नसल्याचे आढळून आले. 

आयुक्तांनी घेतली हजेरी
मनपा कार्यालयात सकाळी १0.३0 वाजता हजेरी लावणे बंधनकारक आहे. उत्तर झोनमध्ये कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे पाहून महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्वत: कर्मचार्‍यांची हजेरी घेतली. अनेक कर्मचार्‍यांना शासकीय कार्यालयाची वेळ कोणती, याची माहितीच नसल्याचे समोर आले. 

शासकीय कार्यालयांमध्ये किती वाजता हजर राहावे लागते, याबाबत मनपा कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे पाहून आश्‍चर्य वाटले. थम्ब मशीनसाठी अनेक कर्मचार्‍यांनी जाणीवपूर्वक नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे. यानंतर हजेरीसाठी थम्ब मशीनचा वापर अनिवार्य केला जाईल. 
-जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा

Web Title: LateTitif, employee of North Zone, Akola Municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.