गजानन महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण

By admin | Published: May 17, 2014 07:52 PM2014-05-17T19:52:21+5:302014-05-17T20:09:53+5:30

शिवणी येथे उभारण्यात आलेल्या गजानन महाराज मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

Launch of Gajananan Maharaj Temple | गजानन महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण

गजानन महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण

Next

शिवर : शिवणी येथे समर्थ सद्गुरू सेवा संस्थानच्यावतीने उभारण्यात आलेल्या गजानन महाराज मंदिराचे लोकार्पण, तसेच गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरुवार, १५ मे रोजी तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात करण्यात आली. यावेळी मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमाला हभप जगदीश महाराज ठोकळ (वाघागड), हभप गोपाल महाराज उरळकर, हभप लक्ष्मीनारायण दायमा महाराज (पारस), हभप मनोहर महाराज ढोरे (शिवापूर), हभप सदानंद महाराज गावंडे (धोतर्डी), शांताराम मुरूमकार, हभप बळीराम महाराज दोड (शिवर), हभप आर्य महाराज, दत्तात्रय जोशी महाराज, जगदीश मुरुमकार, हभप श्रीकृष्ण महाराज मुरूमकार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सर्व मान्यवर महाराजांचा संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. सर्व महाराजांनी आपले मत व्यक्त करताना समर्थ सद्गुरू सेवा संस्थानने अल्पावधीत केलेल्या उत्कृ ष्ट कार्याचे कौतुक केले. तसेच संस्थानला सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही केले. समर्थ सद्गुरू सेवा संस्थानचे अध्यक्ष शांताराम मुरूमकार यांनी महाराजांचे, सर्व मान्यवर मंडळीचे व देणगीदात्यांचे आभार मानले. या संस्थानच्यावतीने १४ ते १५ मे २०१४ दरम्यानच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांचा समारोप हभप संतोष महाराज सखारामपूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला. याप्रसंगी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. 

Web Title: Launch of Gajananan Maharaj Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.