‘थेट बांधावर खत’ मोहिमेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:48+5:302021-05-10T04:17:48+5:30
अकोला : जिल्ह्यात संचारबंदी असल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये, याकरिता थेट बांधावर खत मोहिमेस सुरुवात करण्यात ...
अकोला : जिल्ह्यात संचारबंदी असल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये, याकरिता थेट बांधावर खत मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कृषी केंद्रावर येऊन रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके खरेदीसाठी गर्दी होऊ नये, याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. कांतप्पा खोत यांच्या मार्गदर्शनखाली नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अकोला तालुक्यात शेतकरी गटाच्या वतीने डीएपी-४० गोणी, १०:१०:२६-४० गोणी, युरीया-२० गोणी एकूण १ लाख ७ हजार रुपये किमतीचे रासायनिक खते खरेदी करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी डी. एस. प्रधान, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, पं. स. कृषी अधिकारी अनिल राठोड, धनंजय मेहेरे, सुभाष राऊत व गटातील सदस्य उपस्थित होते.