‘सुजलाम, सुफलाम’अंतर्गत कारंजा तालुक्यात जलसंधारण कामाचा शुभारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 03:42 PM2018-12-16T15:42:05+5:302018-12-16T15:43:09+5:30

कारंजा तालुक्यातील महागाव  येथे नाला खोलीकरण व समतल चर खोदकाम व शेततळ्याचा  शुभारंभ आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते करण्यात आला.

Launch of water conservation work in Karanjha taluka under 'Sujlam, Suphalam'! | ‘सुजलाम, सुफलाम’अंतर्गत कारंजा तालुक्यात जलसंधारण कामाचा शुभारंभ !

‘सुजलाम, सुफलाम’अंतर्गत कारंजा तालुक्यात जलसंधारण कामाचा शुभारंभ !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत तिसºया टप्प्यात कारंजा तालुक्यातील महागाव  येथे नाला खोलीकरण व समतल चर खोदकाम व शेततळ्याचा  शुभारंभ आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते करण्यात आला.
 यावेळी गटविकास अधिकारी तापी, तालुका कुषी अधिकारी संतोष वाळके, सरपंच बेबीताई राठोड, जयकिसन राठोड, दिनेश राठोड, डॉ. शरद दहातोंडे,  प्रफुल बाणगावकर, ग्रामसेवक वंजारी यांची उपस्थिती होती. या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी यांनी नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ  केला. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी जलसंधारणाच्या कामात स्वयंस्फुर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार पाटणी यांनी केले. कारंजा तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी तसेच पोकलन मशिन मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत तर शासनाच्यावतीने डिझेल पुरविले जात आहे. कारंजा तालुक्यात दोन टप्प्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण झाली असून, आता तिसºया टप्प्यात जलसंधारणाच्या कामांना सुरूवात झाली आहे. लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून जलसंधारणाच्या कामांना ‘लोकचळवळी’ चे स्वरुप प्राप्त होत असल्याचे दिसून येते.

Web Title: Launch of water conservation work in Karanjha taluka under 'Sujlam, Suphalam'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.