वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुट्या नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 02:19 PM2020-04-25T14:19:26+5:302020-04-25T14:19:32+5:30

वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुटीचा उपभोग घेता येणार नाही.

Lawyers don’t have this summer vacation! | वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुट्या नाहीत!

वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुट्या नाहीत!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: उच्च न्यायालयाने महिनाभराच्या प्रस्तावित उन्हाळी सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनापासून बचावासाठी सध्या सुरू असलेली संचारबंदी ३ मे रोजी संपली, तर मुंबई उच्च न्यायालयाची मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठे उन्हाळी सुट्या न घेता कामकाज सुरू करतील. सर्व जिल्हा न्यायालयात याप्रमाणेच कामकाज चालणार असल्याने वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुटीचा उपभोग घेता येणार नाही.
याशिवाय न्यायालयाचे कामकाजही नेहमीच्या सकाळी ११ वाजताऐवजी अर्धा तास आधी १०.३० वाजता सुरू होईल, असे उच्च न्यायालयाच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे; मात्र ३ मेनंतरही संचारबंदी कायम राहिली, तर न्यायालयाचे कामकाज सध्या ‘कोविड-१९’ लॉकडाउनमध्ये सुरू असलेल्या पद्धतीनुसारच सुरू राहणार आहे.
३ मेनंतर आणि ७ जूनपूर्वी न्यायालयीन कामकाज ‘लॉकडाउन’ संपल्यानंतर नियमित स्वरूपात पूर्ववत करण्यात आले, तर अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालये उन्हाळी सुटीचा उपभोग घेणार नाहीत. न्यायालयीन कामकाजाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५.४५ पर्यंत राहील. कार्यलयीन कामकाजाची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळ ६ वाजतापर्यंत राहील.
जर न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू होत असेल, तर अशा परिस्थितीत सर्व वकील आणि पक्षकार यांनी नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार येथून प्रवेश करावा, तसेच वकील व पक्षकारांकरिता वाहनतळ ‘कोविड-१९’ महामारीच्या आधी असल्याप्रमाणेच अमलात येईल, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश य. गो. खोब्रागडे यांनी गुरुवार, २३ एप्रिल रोजी निर्देश दिले आहेत. याबाबतचे पत्र अकोला बार असोसिएशनला प्राप्त झाले असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद गोदे यांनी सांगितले.

Web Title: Lawyers don’t have this summer vacation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.