विधिज्ञांना पीएफ, इन्शुरन्स लागू करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:38+5:302021-01-21T04:17:38+5:30
अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात विधिज्ञ व त्यांच्या कुटुंबीयांच्या आराेग्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने अखिल ...
अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात विधिज्ञ व त्यांच्या कुटुंबीयांच्या आराेग्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने अखिल भारतीय अधिवक्ता परिषद अकोला जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष ॲड. सत्यनारायण जोशी यांच्या नेतृत्वात बुधवारी निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड. जोशी यांनी केंद्र सरकारच्यावतीने वकिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले. काेराेनाच्या काळात वकिलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. अनेकांना काेराेनाची लागण झाली. अशा परिस्थितीतही न्यायालयाचे कामकाज सुरु हाेते. या सर्व बाबी लक्षात घेता विधिज्ञ व त्यांच्या कुटुंबीयांसाठी पीएफ व इन्शुरन्स याेजना सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन विधिज्ञांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी अधिवक्ता परिषदेचे जिल्हामंत्री भूषण काळे, किरण खोत, अकोला बार असोसिएशन अध्यक्ष आनंद गोदे, राजेश्वर देशपांडे, विजय भांबेरे, देवाशीष काकड, परेश सोळंकी, आशिष फुंडकर, प्रवीण राठी, भारती रुंगठा, सागर जोशी, सागर डवले आदी प्रामुख्याने हजर होते.