संगणक परिचालकांच्या उपोषणाला नेत्यांच्या भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:27 PM2017-10-17T13:27:05+5:302017-10-17T13:27:15+5:30
बुलडाणा: ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्यावतीने विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषदसमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सर्व पक्षीय नेत्यांनी सोमवारी व मंगळवारी भेटी दिल्या.
बुलडाणा: ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्यावतीने विविध
मागण्यांकरिता जिल्हा परिषदसमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सर्व पक्षीय
नेत्यांनी सोमवारी व मंगळवारी भेटी दिल्या.
संगणक परिचालकांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणेच सुविधा देण्यात याव्यात,
टास्क कनफरमेशन ही जाचक अट रद्द करून शासन निर्णयाप्रमाणे सहा हजार रूपये
वेतन देण्यात यावे, संग्राम प्रकल्पामध्ये त्यांना सामाावून घेण्यात
यावे, आदि मागण्यांकरिता उपोषण सुरू आहे. या उपोषणाला स्वाभिमानीचे
नेते रविकांत तुपकर व आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
रविकांत तुपकर व आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी
अधिकारी षण्मुखराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी चंदणसिंग राजपुत व जि.प.अध्यक्षा उमाताई तायडे
यांच्याशी चर्चा करुन जि.प. स्तरावरील संगणक परिचालकांचे प्रश्न
सोडविण्याच्या सूचना दिल्या.