विदर्भातील नेत्यांनी निधी देऊन काेविड रुग्णालये उभारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:05+5:302021-04-23T04:20:05+5:30
अकोला : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांसाठी सध्या बेड, ऑक्सिजन, औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. नेत्यांकडून केवळ प्रशासनाला ...
अकोला : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांसाठी सध्या बेड, ऑक्सिजन, औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. नेत्यांकडून केवळ प्रशासनाला सूचना दिल्या जातात. एवढ्यावरच न थांबता आता विदर्भातील खासदारांनी दोन तर आमदारांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी कोरोना संकटकाळातील उपाययोजनांसाठी द्यावा. या निधीतून प्रत्येक जिल्ह्यात जम्बो कोविड रुग्णालय उभारावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर पवळ यांनी मांडली आहे.
पवळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, विदर्भात १० खासदार आणि ६२ आमदार आहेत. यासोबतच चार महापौर आणि ११ जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. या प्रत्येक नेत्याकडे अधिक प्रमाणात निधी आहे. काळाची पावले ओळखून हा निधी कोरोनासाठी देण्यात यावा. या निधीतून जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रशासानाने प्रयत्न करून सर्वप्रथम किमान ५०० बेडचे कोविड रुग्णालय प्रत्येक जिल्ह्यात उभारावे. वेळ पडल्यास आयएमएच्या माध्यमातून डॉक्टर, मेडिकल कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, एखाद्या खासगी एजन्सीला जम्बो कोविड उभारण्याचे काम द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.