शिंगोली शिवारात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:09 PM2019-12-10T12:09:47+5:302019-12-10T12:09:57+5:30

बिबट्या दिसल्याने शेतशिवारातील कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे.

Leaopard found in Shingoli field | शिंगोली शिवारात बिबट्याचा वावर

शिंगोली शिवारात बिबट्याचा वावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हातरुण : शिंगोली गावानजीकच्या शेतशिवारात सोमवारी सायंकाळच्या दरम्यान बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतशिवारात कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. बिबट्या दिसल्याने शेतशिवारातील कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे.
गावात व शेतशिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढताना दिसून येत आहे. शिवारात जंगली जनावरांमुळे शेतीपिकांचे नुकसान नित्याचे झाले आहे; मात्र आता बिबट्याचाही धुमाकूळ सुरू झाला आहे. बाबुराव बोर्डे यांना शेतशिवारात संध्याकाळच्या सुमारास गेले असता त्यांना बिबट्या दिसला. याविषयी संपूर्ण गावात पसरल्याने शेतकरी, शेतमजूर शेतात जात नसल्याने शेतशिवारातील कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी ताबडतोब वन विभागाने प्रयत्न करावेत, अशी मागणी शिंगोली येथील सरपंच महेश बोर्डे, सुधाकर बोर्डे, प्रवीण बोर्डे, शंकरराव बोर्डे यांनी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याची सूचना
सरपंच महेश बोर्डे यांनी गावात दवंडीद्वारे ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याची सूचना देण्याचे सांगितले. गावाशेजारच्या शिवारात वाघ दिसल्याने नागरिकांच्या भीतीत भर पडली आहे. वन विभागाने शोध मोहीम राबवण्याची मागणी तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकरराव बोर्डे यांनी केली आहे.

Web Title: Leaopard found in Shingoli field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.