जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची आज आरक्षण सोडत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:20 AM2021-03-23T04:20:15+5:302021-03-23T04:20:15+5:30

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १४ जागा आणि त्याअंतर्गत जिल्ह्यातील ...

Leaving reservation for general women category for vacant seats of Zilla Parishad and Panchayat Samiti today! | जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची आज आरक्षण सोडत!

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची आज आरक्षण सोडत!

Next

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १४ जागा आणि त्याअंतर्गत जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी, दि. २३ मार्च रोजी काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आणि पंचायत समित्यांच्या रिक्त जागांची आरक्षण सोडत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांत काढण्यात येणार आहे.

गतवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत देण्यात आलेले प्रवर्गनिहाय आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने, या निवडणुकीत निवडून आलेल्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून, पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी दिला. त्यानुसार जिल्ह्यातील ‘ओबीसी’ प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांचे आणि सात पंचायत समित्यांच्या २८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार रिक्त झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येत आहे. त्यानुषंगाने २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा परिषदेच्या रिक्त १४ जागांसाठी आणि सात पंचायत समित्यांच्या रिक्त २८ जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीची तयारी प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.

Web Title: Leaving reservation for general women category for vacant seats of Zilla Parishad and Panchayat Samiti today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.