आठ शहरांमध्ये लागणार एलईडी पथदिवे!

By admin | Published: October 22, 2016 02:41 AM2016-10-22T02:41:28+5:302016-10-22T02:41:28+5:30

केंद्र शासनाकडून कंपनीची नियुक्ती.

LED streetlights for eight cities | आठ शहरांमध्ये लागणार एलईडी पथदिवे!

आठ शहरांमध्ये लागणार एलईडी पथदिवे!

Next

आशिष गावंडे
अकोला, दि. २१- महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये एलईडी पथदिवे उभारून त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केंद्र शासनाने ह्यईईएसएलह्ण कंपनीला दिले आहे. कंपनीच्या माध्यमातून एलईडी लावण्याचे निर्देश राज्यातील आठ महापालिकांना प्राप्त झाले आहेत.
वीज बचत करण्याच्या उद्देशातून सीएफएल पथदिव्यांना बाजूला सारत लख्ख उजेड देणार्‍या एलईडी पथदिव्यांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. राज्यातील आठ महापालिकांमध्ये केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या ह्यईईएसएलह्ण कंपनीमार्फत एलईडी पथदिवे उभारण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. कंपनीने पथदिवे लावल्यानंतर सात वर्षांंपर्यंंत त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची अट नमूद आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित कंपनीला दिल्यास महापालिकेची मोठी आर्थिक बचत होईल, असे मानल्या जात आहे. दहा वर्षांंंपूर्वी बहुतांश मनपा क्षेत्रात सोडियम पथदिव्यांचा वापर केला जात असे. त्या बदल्यात महापालिकांना अतिरिक्त वीज देयकाचा भुर्दंंड सहन कराव लागत होता. त्याला पर्याय म्हणून सीएफएल पथदिव्यांचा वापर करण्यात आला. सीएफएलमुळे लख्ख उजेड पडत नसल्याने नागरिकांना अंधूक उजेडाचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यानिमित्ताने एलईडीचा पर्याय समोर आला आहे. प्रकाशमान असणार्‍या एलईडी पथदिव्यांसाठी वीज कमी लागत असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला असून, मनपा क्षेत्रामध्ये एलईडी पथदिवे लावण्यासाठी ह्यईईएसएलह्ण कंपनीची नियुक्ती केली.

आठ महापालिकांना निर्देश
अकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे, मीरा-भाईंदर, मालेगाव, भिवंडी-निजामपूर व वसई-विरार या महापालिका क्षेत्रात एस्को तत्त्वावर एलईडी पथदिवे लावण्याचे नगरविकास विभागाचे निर्देश आहेत. त्यानुसार महापालिकांनी प्रक्रिया सुरू केली आहे.

२0 कोटींचे लागणार पथदिवे
एलईडी पथदिव्यांसाठी स्थानिक आमदारांना शासनाने १0 कोटींची रक्कम मंजूर केल्यानंतर उर्वरित दहा कोटींचा हिस्सा मनपाने जमा करण्याची अट आहे. मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून उर्वरित दहा कोटींची रक्कम जमा केली असून, एकूण २0 कोटी रुपयांतून शहरातील प्रमुख रस्ते व प्रमुख चौकांमध्ये प्रकाशमान एलईडी पथदिवे उभारल्या जातील.

Web Title: LED streetlights for eight cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.