कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा! दरही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:10+5:302021-04-07T04:19:10+5:30

--बॉक्स-- मोसंबी जालन्यातून, संत्री परतवाडा तर लिंबू अकोल्यातूनच! शहरातील बाजारपेठेत मोसंबी जालना, औरंगाबाद, संत्रा परतवाडा व जिल्ह्यातील पातूर या ...

Lemon, orange, citrus extract on the corona! Rates also increased | कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा! दरही वाढले

कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा! दरही वाढले

Next

--बॉक्स--

मोसंबी जालन्यातून, संत्री परतवाडा तर लिंबू अकोल्यातूनच!

शहरातील बाजारपेठेत मोसंबी जालना, औरंगाबाद, संत्रा परतवाडा व जिल्ह्यातील पातूर या भागातून येत आहे. तसेच लिंबूची इतर जिल्ह्यातून आवक बंद आहे. जिल्ह्यातील वाडेगाव, पातूर या भागातील लिंबू उत्पादकांचा माल येथील बाजारात येत आहे.

--बॉक्स--

प्रतिकिलो दर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल

लिंबू ७० ४० ३० ३५

मोसंबी १२० ८० ६० ५०

संत्री २०० १०० ७० ५०

--बॉक्स--

२५-५० टक्क्यांनी वाढले दर

बाजारात संत्र्याची आवक बंद आहे. एखाद्याच दिवशी माल येतो आणि तोही अव्वाच्या सव्वा दराने विकला जात आहे. जानेवारीमध्ये २०-३५ रुपये किलो विकल्या जाणारे लिंबू आता ६०-७० रुपये किलो झाले आहे. तसेच मोसंबीची आवक कमी असल्याने दर वाढले आहेत.

--बॉक्स--

इम्युनिटी वाढते! मी फळे खातो, तुम्हीही खा!

--कोट--

कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर जास्त भर देत आहे. कुटुंबातील सर्व सदस्य दररोज फळे खात आहेत. संत्रा, मोसंबी ज्यूस करून घेत आहोत.

प्रवीण देशमुख

--कोट--

दररोजच्या आहारात फळांचा समावेश केला आहे. फळे आरोग्यवर्धक असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त फळे खातो.

विजय पाटील

--बॉक्स--

तज्ज्ञ काय म्हणतात?

--कोट--

लिंबूमध्ये क जीवनसत्त्व असते. जीवनसत्त्व ‘क’मुळे वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती शरीरास मिळते, सोबतच हाडेही मजबूत होतात. हृदयासंबंधी आजारांवरही जीवनसत्त्व ‘क’ फायदेशीर आहे. त्यामुळे लिंबू सेवन फायदेशीर आहे.

डॉ. झिशान हुसेन

--कोट--

संत्री आणि मोसंबी ही अत्यंत गुणकारी फळे आहेत. मोसंबीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. मोसंबीमध्ये जीवनसत्त्व ‘क’ मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. या जीवनसत्त्वांचा अतिरेकही टाळणे गरजेचे आहे.

डॉ. राजेंद्र ढवळे

Web Title: Lemon, orange, citrus extract on the corona! Rates also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.