काळवीटावर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:23 AM2021-09-15T04:23:52+5:302021-09-15T04:23:52+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सुकळी येथे बिबट्याच्या हल्ल्यात काळवीट ठार झाल्याची घटना मंगळवार, दि. १४ ...
खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सुकळी येथे बिबट्याच्या हल्ल्यात काळवीट ठार झाल्याची घटना मंगळवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी भयभीत झाले आहे.
सुकळी शिवारात शेतकरी तेजराव तेलगोटे हे शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता, बिबट्याने काळवीटावर हल्ला केल्याचे आढळून आले, सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांनी चतारी येथील पोलीस पाटील विजय सरदार यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटील सरदार यांनी याबाबत आलेगाव वन विभागास माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी एस. बी. ढेंगे, वर्तुळ, अविनाश घुगे, आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला. बिबट्याने काळवीटावर हल्ला केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे सुकळी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या शेतात कपाशी, सोयाबीन, तूर आदी पीक शेतात असल्याने शेतकरी व शेतमजुरांना दररोजी शेतात जावे लागत आहे. परंतु बिबट्याच्या काळवीटावर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
140921\img-20210914-wa0157.jpg
फोटो