कालव्यात पडून बिबटाचा मृत्यू; कुजलेला मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:09 PM2019-01-21T13:09:07+5:302019-01-21T13:09:51+5:30
बोरगाव मंजू (अकोला) : अकोला तालुक्यातील कोठारी येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यात पाच वर्षे वयाचा बिबट सोमवारी सकाळी मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
बोरगाव मंजू (अकोला) : अकोला तालुक्यातील कोठारी येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यात पाच वर्षे वयाचा बिबट सोमवारी सकाळी मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर बिबट कालव्याच्या पाण्यात बुडून मरण पावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रब्बी हंगामासाठी काटेपूर्णा प्रकल्पावरून कालव्याद्वो पाणी सोडण्यात येत आहे. हा कालवा बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठारी गावातून पुढे बारुला विभागापर्यंत जातो. सोमवारी सकाळी कोठारी येथील शेतकरी गजानन गावंडे हे शेतात जात असताना त्यांना कालव्यात बिबट मृतावस्थेत पडलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी बोरगाव मंजू पोलिस व अकोला वन विभागाला माहिती दिली. वन विभागाचे प्रकाश गिते, एन. एम.मोरे , सुरेश गवई, विठ्ठल सारसे आदी घटनास्थळी धाव घेऊन बिबटाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. सदर बिबट हा अंदाजे वय पाच वर्षे वयाचा असुन पाच ते सहा दिवसापूर्वी मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारणे शवविच्छेदनानंतर समजु शकेन असे वनविभागाचे प्रकाश गिते यांनी ‘लोकमत’शी बोलतान सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कानशिवनी, खांबोरा शिवारात शेतकº्यांना रात्रीच्या वेळी वाघ दिसल्याचे चर्चा होती. शेतकऱ्यांना हाच बिबट दृष्टीस पडला असावा असा अंदाज आहे. हाा बिबट खांबोरा शिवारातुन कालव्यात वाहुन आला असावा व कोठारीनजीक अडकला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (वार्ताहर)