अज्ञात वाहनच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 11:36 IST2020-11-11T11:34:14+5:302020-11-11T11:36:38+5:30
Leopard News वघाडी नाल्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू

अज्ञात वाहनच्या धडकेत बिबट्या ठार
ठळक मुद्देघटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली. अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
बाळापूर: पातूर-बाळापूर मार्गावरील मांडवा फाट्यानजीकच्या वघाडी नाल्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.