बिबट्याचे पिलूू आढळले

By admin | Published: September 20, 2015 11:22 PM2015-09-20T23:22:28+5:302015-09-20T23:22:28+5:30

मातोळा तालुक्यातील खेडी येथे बिबट्याचे पिलू आढळले.

The leopard was found in Pillhu | बिबट्याचे पिलूू आढळले

बिबट्याचे पिलूू आढळले

Next

मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील रोहिणखेड शिवारातील जंगलालगतच्या परिसरात खेडी येथील एका शेतकर्‍याच्या शेतात बिबट्याचे पिलू १९ सप्टेंबर रोजी आढळले. शेतात काम करीत असलेल्या शेतकर्‍याने या पिलाच्या आरडाओरडीने त्याच्याकडे धाव घेतली तेव्हा त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. हे पिलू नर होते. धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी येथील ङ्म्रीराम हरी चव्हाण यांचे शेत रोहिणखेड शिवारातील जंगल परिसराला लागून आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे शेतात काम करीत असताना त्यांना बिबट्याच्या पिलाच्या ओरडण्याचा आवाज आला. कुतूहलाने त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, बिबटचे ४ ते ५ दिवसांचे नर जातीचे पिल्लू ओरडत होते. सदर पिलू पाहताच जवळच मादी बिबट असल्याच्या कल्पनेने त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली. सदर घटनेची माहिती त्यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळवली. ही माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पी. टी. कसले, वनपाल संजय राठोड, वनरक्षक नागरे, देशमुख, तवलारकर, मुंजाळकर, लवंगे, सोनुने व चालक गणेश जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी शेताच्या बांधावर अडगळीच्या ठिकाणी गवताच्या गुहेमध्ये मादी बिबटचे चार ते पाच दिवसांचे पिलू असल्याचे त्यांना आढळले. या घटनेची माहिती गावकर्‍यांना होताच शेतात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी मादी बिबटापासून प्राणहानी होऊ नये, यासाठी परिसरातील गर्दी हटवून त्या ठिकाणी दुपारी दोन वाजेपासून गस्त लावली. रात्री उशिरापर्यंत कोणलाही त्या परिसरात प्रवेश करू दिला गेला नाही. यादरम्यान आजूबाजूच्या शेतकर्‍यांना मादी बिबटाची कल्पना देण्यात आली होती. या कामात खेडी येथील नागरिकांनी कर्मचार्‍यांना मदत केली. रविवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी पुन्हा त्या जागेची पाहणी केली असता, बिबट मादीने पिलास त्या ठिकाणाहून नेल्याचे आढळून आले. या शेतालगतच रोहिणखेड शिवाराचे जंगल सुरू होत असल्यामुळे मादी बिबट आपल्या पिलासह जंगलात निघून गेली असावी, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: The leopard was found in Pillhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.