जिल्ह्यात उद्यापासून कुष्ठरोग, क्षयरोग रुग्ण शोध मोहीम!
By प्रवीण खेते | Published: September 12, 2022 04:01 PM2022-09-12T16:01:25+5:302022-09-12T16:02:01+5:30
मोहिमेंतर्गत विशेष कामगीरी बजावण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मोहिमेंतर्गत कुष्ठरोग आणि क्षयरोगाबद्दल लोकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येणार आहे.
अकोला : जिल्ह्यातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांची शोध मोहीम मंगळवार १३ सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असलेल्या भागामध्ये कुष्टरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा शोध घेण्यात येणार आही. ही मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत राबविली जाणार आहे.
मोहिमेंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण तसेच क्षयरुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे, कुष्ठरोग दुरिकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करण्यात येणार आहे. मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांमार्फत गृहभेटी देऊन कुष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या संदिग्ध व्यक्तींना शोधून त्यांचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शासकीय रुग्णालयात ७६०, तर ८६ क्षयरुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने मोहिमेंतर्गत विशेष कामगीरी बजावण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मोहिमेंतर्गत कुष्ठरोग आणि क्षयरोगाबद्दल लोकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येणार आहे.