जूनअखेर अपेक्षित सरासरीपेक्षा कमी पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:54 PM2019-07-01T13:54:04+5:302019-07-01T13:54:25+5:30
अकोला: दरवर्षीच्या पावसाळ्यात १ ते २९ जून या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरासरी १४८.६ मिलिमीटर पाऊस कोसळतो
अकोला: दरवर्षीच्या पावसाळ्यात १ ते २९ जून या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरासरी १४८.६ मिलिमीटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र तुलनेने उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे हे प्रमाण केवळ १३३.२ मिलिमीटर असून, लघू आणि मध्यम असे सर्व प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. दुसरीकडे अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपातील पेरण्याची लगबग सुरू केल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी १४८.६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात या सरासरीच्या जवळ पोहोचणारा पाऊस झाला असला तरी सार्वत्रिक व दमदार नाही त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा कायमच आहे.
जमिनीत किमान ९ ते १० इंचाची ओल आल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांच्या पेरणीची घाई करू नये; अन्यथा पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीची शक्यता उद्भवू शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला होता; मात्र पावसाळ्यास आधीच उशीर झाल्याने आणि पावसाचा जोर वाढल्यास पेरणीची कामे शक्य होणार नसल्याने पहिल्या एक-दोन पावसातच अनेक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या आहेत.