महाबीजकडून १५ हजार क्विंटल बियाणांचा कमी पुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:14 AM2021-06-06T04:14:49+5:302021-06-06T04:14:49+5:30
बियाणे उगवण चाचणीत फेल महाबीजला मोठ्या प्रमाणात सोयाबीन प्राप्त झाले होते; परंतु मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे उगवण चाचणीत फेल ...
बियाणे उगवण चाचणीत फेल
महाबीजला मोठ्या प्रमाणात सोयाबीन प्राप्त झाले होते; परंतु मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे उगवण चाचणीत फेल झाल्याचे महाबीजकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुरवठा कमी झाला.
‘पावतीवर शिक्के’ प्रकरणावर तीव्र संताप
आधीच शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांचे बियाणे ३२००-३४०० रुपये दराने विकत घ्यावे लागत आहे. त्यात कृषी सेवा केंद्र संचालकांकडून बियाणे खरेदी केलेल्या बिलावर ‘सदर सोयाबीन बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे, तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईन’, असा शिक्का मारल्याचा प्रकार तेल्हारा तालुक्यात घडला. त्यामुळे शेतकरी व शेतकरी संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कमी पुरवठा खासगी कंपन्यांच्या पथ्यावर!
महाबीजकडून जिल्ह्यात कमी बियाणांचा पुरवठा झाला आहे. याचा फायदा घेत खासगी कंपन्यांनी बियाणांचे दर वाढविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाबीजकडून झालेला कमी पुरवठा खासगी कंपन्यांच्या पथ्यावर पडला आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मागील वर्षी बियाणांचा झालेला पुरवठा
२६,०००
यावर्षी बियाणांच्या पुरवठ्याचे नियोजन
२५,०००
यावर्षी बियाणांचा झालेला पुरवठा
११,०००