बोगस बियाणे ओळखण्यासाठी आता पोलिसांना देणार धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:58 AM2018-04-07T01:58:38+5:302018-04-07T01:58:38+5:30
अकोला : विदर्भात दरवर्षी बियाण्यांचा काळाबाजार होत असून, अप्रमाणित बियाणे विक ले जाते. यावर्षीही असे बियाणे विकले जाण्याची शक्यता बघता, कृषी विभागाने अमरावती विभागीय स्तरावर ६१ भरारी पथके तयार केली आहेत. यावर्षी या कामी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनाही बोगस, अप्रमाणित बियाणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भात दरवर्षी बियाण्यांचा काळाबाजार होत असून, अप्रमाणित बियाणे विक ले जाते. यावर्षीही असे बियाणे विकले जाण्याची शक्यता बघता, कृषी विभागाने अमरावती विभागीय स्तरावर ६१ भरारी पथके तयार केली आहेत. यावर्षी या कामी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनाही बोगस, अप्रमाणित बियाणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पश्चिम विदर्भात मागील चार-पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणात बोगस, अप्रमाणित बियाणे व रासायनिक खताचा साठा आढळून आला. गतवर्षी अप्रमाणित कीटक, तणनाशकांचा साठा अकोल्यासह अमरावती, यवतमाळ व इतर जिल्हय़ात आढळला. त्या अगोदर मूर्तिजापूर येथे बोगस खताचा साठा सापडला होता. अकोटात सोयाबनीचे बोगस बियाणे तयार करणारा चक्क कारखानाच निदर्शनास आला होता.
बोगस रासायनिक खतेही आढळून आली. पण, मागील पाच वर्षांत सापडलेल्या बोगस खताचा किती साठा विकला गेला, काय कारवाई केली, याची अद्याप पूर्ण माहिती नाही. ही खते शोधून काढण्यासाठी अधिकार्यांची मोठी कसोटी लागणार असल्याचे ‘लोकमत’ने या संबंधी वारंवार कृषी विभागाला सतर्क केले आहे, हे विशेष.
पश्चिम विदर्भात कोणतीही व्यक्ती बोगस व बेकायदेशीर बियाण्यांची विक्री-व्यापार करताना आढळल्यास, त्याच्यावर बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल. बोगस बियाणे विक्रीचा व्यवसाय करताना कोणी आढळल्यास शेतकरी, कृषी निविष्ठा वितरक, विक्रेते तसेच नागरिकांनी तत्काळ कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी किंवा टोल फ्री क्रमांक १८00२३३४000 वर संपर्क साधणे गरजेचे आहे.
बियाणे खरेदी करताना काळजी घ्या!
कापसाच्या बोगस बियाण्यांमुळे शेतीचे तसेच पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी शेतकर्यांनी कापूस बियाण्याची खरेदी करताना अधिकृत परवानाधारक दुकानदाराकडून बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदी करतेवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. बोलगार्ड २ बियाणे घेतेवेळी पाकीट सीलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करू न घ्यावी. बोलगार्ड २ चे अधिकृत चिन्ह व शासनाचे मान्यताप्राप्त चिन्ह पाहूनच शेतकर्यांनी बियाणे, खते खरेदी करणे गरजेचे आहे.
अप्रमाणित खते; प्रकरण न्यायालयात
अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत २0१६-१७ च्या खरीप हंगामात अप्रमाणित खताचा साठा सापडला होता. त्या प्रकरणाची न्यायालयात सुणावणी सुरू आहे. ६ एप्रिलला हे प्रकरण न्यायालयासमोर आले होते. आता येत्या १0 एप्रिलला यावर सुनावणी होणार असल्याची शक्यता असल्याने न्यायालयाच्या निकालाकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
यावर्षी विभाग स्तरावर ६१ भरारी पथके तयार करण्यात आली असून, पोलीस व महसूल विभागाच्या अधिकार्यांची मदत घेतली जाणार आहे. याकरिता त्यांना प्रशिक्षण दिले जाणार.
- डॉ. पी.व्ही. चेडे,
विभागीय गुण नियंत्रण अधिकारी, अमरावती.