स्वयंसेवकामार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:06+5:302021-09-26T04:21:06+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील ३० गावांत मागील काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमार्फत शिक्षण विभाग अकोलाच्या सहकार्यातून ...
मूर्तिजापूर : तालुक्यातील ३० गावांत मागील काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमार्फत शिक्षण विभाग अकोलाच्या सहकार्यातून शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, याकरिता प्रत्येक गावात इच्छुक युवक,युवती यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. या स्वयंसेवकांमार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणे सुरू आहे.
तालुक्यातील ३० गावांत उच्चशिक्षित युवती स्वयंप्रेरणेने आणि प्रथमच्या सहकार्याने वर्ग घेत आहेत.
गावामध्ये सुरू असलेल्या वर्गाला ‘प्रथम’चे सुनील इंगळे, भावेश हिरुळकर, वैभव बाजड, अमोल नाईक, जयश्री पवार, स्वाती गावडे, मनिष ठाकरे यांनी नुकतीच सर्व गावांत जाऊन स्वयंमसेवक वर्गाला भेट देऊन गावातील शिक्षणप्रेमी स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा केली. शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला असता मुला-मुलींनी व माता पालककांनी चांगला प्रतिसाद दिला.
--------------------------------
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोहल्ला वर्ग सुरू!
विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयाचे मूलभूत क्रियाकृती प्रशिक्षण व साहित्य देऊन गावात मोहल्ला वर्ग सुरू करण्यात आले. वर्गात सोयीनुसार दररोज एक ते दोन तास गावांतील मुलांना भाषा आणि गणित विषयाच्या माइंड मॅप, बाराखडीवरून शब्द तयार करणे, संख्या वाचन, बेरीज, वजाबाकी, खेळ आदींचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.