शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ - धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:33 AM2017-11-20T01:33:14+5:302017-11-20T01:33:53+5:30

अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी रविवारी खासदार संजय धोत्रे यांची भेट घेतली. खा. धोत्रे यांनी याविषयी भूसंपादन अधिकार्‍यांशी चर्चा केली, तसेच शेतकर्‍यांवरील अन्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक लावून दूर करण्याचे आश्‍वासन दिले.

Let the farmers get justice - Dhotre | शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ - धोत्रे

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ - धोत्रे

googlenewsNext
ठळक मुद्देभूसंपादनकेंद्रीय मंत्र्यांबरोबर लवकरच घेणार बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
पारस : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या चौपदरीकरणाच्या कामात जमीन संपादित करण्यात आली. यामध्ये बाळापूर तालुक्यातील शेतकर्‍यांची जमीन शासनाने संपादित केली आहे. त्याचा मोबादला देताना मात्र बाळापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करण्यात आला आहे. याविषयी अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी रविवारी खासदार संजय धोत्रे यांची भेट घेतली. खा. धोत्रे यांनी याविषयी भूसंपादन अधिकार्‍यांशी चर्चा केली, तसेच शेतकर्‍यांवरील अन्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक लावून दूर करण्याचे आश्‍वासन दिले. 
राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी शेतकर्‍यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. संपादित जमिनीचा मोबदला देताना मात्र बाळापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना इतरांच्या तुलनेत कमी देण्यात आला. त्यामुळे या शेतकर्‍यांनी आतापर्यंत अनेक निवेदने दिली आहेत. रविवारी या अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी खासदार संजय धोत्रे यांची भेट घेतली.
 यावेळी खासदार धोत्रे यांनी या प्रकरणाची माहिती घेतली व भूसंपादन अधिकारी संजय खडसे यांच्याशी चर्चा केली. तसेच या अन्यायासंदर्भात केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लवकरच बैठक लावून शेतकर्‍यांना न्याय देऊ, असे आश्‍वासन दिले. आमदार रणधीर सावरकर यांनी हा प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष तेजराव थोरात यांनी शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत राहण्याची विनंती खासदार धोत्रे यांना केली. यावेळी खा. संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, भूसंपादन अधिकारी संजय खडसे, मुरलीधर राऊत, विलास पोटे, मो. अब्रार, संजय शर्मा, कंडारकर, वारकरी, हिवरकर यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Let the farmers get justice - Dhotre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.