होऊन जाऊ द्या, शुभमंगल सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:13 AM2021-07-03T04:13:15+5:302021-07-03T04:13:15+5:30
शुभमुहूर्त जुलै २०२१ मध्ये केवळ १, २, ६, १२ आणि १६ तारखेला विवाहसोहळा शुभ कार्ये केली जाऊ शकतात. लग्नाचा ...
शुभमुहूर्त
जुलै २०२१ मध्ये केवळ १, २, ६, १२ आणि १६ तारखेला विवाहसोहळा शुभ कार्ये केली जाऊ शकतात. लग्नाचा मुहूर्त १६ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर पुढील चार महिने लग्नासाठी मुहूर्त नाही. विवाह मुहूर्त वर्षाच्या शेवटी म्हणजे नोव्हेंबरपासून सुरू होईल.
या असतील अटी
जिल्हा प्रशासनाकडून सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घातले आहे. यामध्ये लग्नाला परवानगी दिली आहे ; परंतु लग्नसोहळ्याला मंगल कार्यालये, सभागृह, विवाहस्थळी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
परवानगीसाठी अग्निदिव्य
शासनाने कोरोनाचे नियम पाळून लग्न समारंभ करता येणार असल्याचे सांगितले आहे ; मात्र लग्न समारंभासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागणार आहे.
यामध्ये शहराकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालयातून परवानगी घेता येणार आहे. तर तालुका स्तरावरुन संबंधित नगरपालिका व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
तर ग्रामीण क्षेत्राकरिता तहसीलदार यांच्याकडून परवानगी घेता येणार आहे. यामध्ये कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
वधू-वर पित्याची कसरत
केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ आटोपावे लागणार आहे. त्यामुळे सगळे नातेवाईक बोलावता येणार नाही. याकरिता परवानगीही घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अडचणी येणार आहे.
- अनिल पाटील, वधू पिता
कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडावे लागणार आहे. त्यामुळे इतर नातेवाइकांची नाराजी ओढावणार आहे. यावेळी कोरोना नियमांचे पालनही करावे लागणार आहे.
- विनोद ढवणे, वर पिता