मोबाइलच्यामाध्यमातून मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे द्या !

By Admin | Published: January 30, 2016 02:18 AM2016-01-30T02:18:59+5:302016-01-30T02:18:59+5:30

काशी (वाराणसी) पीठाचे जगद्गुरू यांचा सल्ला.

Let your children learn from the medium of mobile! | मोबाइलच्यामाध्यमातून मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे द्या !

मोबाइलच्यामाध्यमातून मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे द्या !

googlenewsNext

धनंजय कपाले/वाशिम: तंत्रज्ञानाचा वापर करायलाच हवा. त्यापासून दूर राहून चालणार नाही; मात्र तरुण पिढी किंवा लहान मुलांच्या हाती मोबाइल देताना पालकांनी त्यांना विशेष सूचना दिल्या पाहिजेत. मोबाइलमध्ये संस्कृतीची माहिती असलेले अनेक अँप्स आहेत तसेच संस्कृतसबंधी माहिती असणार्‍या अनेक वेबसाइट आहेत. त्या मुलांच्या मोबाइलमध्ये टाकून त्यांना त्याद्वारे आपल्या संस्कृतीशी अवगत करणे गरजेचे आहे. यामुळे संस्कृतीचे रक्षणही होईल आणि मुले तंत्रज्ञानापासून दूरही जाणार नाहीत, असे मत काशी (वाराणसी) पीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले. ते वाशिम तालुक्यातील काटा येथे शिवनाम सप्ताहाच्या कार्यक्रमनिमित्त आले होते.

प्रश्न : सध्या अनेक जण देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत आहेत.
-चार-दोन लोकांच्या म्हणण्याने देशामध्ये असहिष्णुता पसरली, असे ठरविणे चुकीचे आहे. काही ठरावीक लोकांनीच हा आरोप केला आहे. त्यांची पृष्ठभूमी तपासणे गरजेचे आहे.

प्रश्न : देशातील धार्मिक वाद टाळण्यासाठी काय करता येईल?
-देशामध्ये धार्मिक वाद मुळीच नाहीत. भारत देश हा विश्‍वसंस्कृतीचे उगमस्थान आहे. जागतिक स्तरावर मानवाने केलेल्या संशोधनांचा विचार केल्यास, त्यात भारताचा सिंहाचा वाटा आहे. भारताने जगाला अध्यात्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, अवकाश विज्ञान, ज्योतिषशास्त्र, दर्शनशास्त्र, गणित अशा असंख्य क्षेत्रात अमूल्य आणि एकमेव योगदान दिले आहे. आपल्या देशात ऋषी-मुनींच्या काळापासून सर्वधर्म समभावाची संस्कृती रुजलेली आहे. आजही सर्वधर्म समभावाची संस्कृती टिकून आहे.

प्रश्न : राम मंदिर निर्माण करण्याबाबत आपले काय मत आहे?
-राम मंदिर निर्माण करण्यासाठी सध्या जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. राम मंदिराच्या जागेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने यावर भाष्य करणे ठीक नाही. मंदिराच्या जागेबाबत न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. न्यायालयाचा निर्णय ऐकण्यासाठी सर्व देश आतुर होऊन बसला आहे. लवकरच निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे.

प्रश्न : संस्कृत भाषा टिकविण्यासाठी काय करता येईल ?
-संस्कृत ही एक ऐतिहासिक भाषा असून, ती पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून, ती भारताच्या २३ शासकीय राजभाषांपैकी एक आहे. संस्कृतमधील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृत भाषा टिकण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी तो विषय शिकण्याचा आग्रह केला पाहिजे.

प्रश्न: विद्यमान शासनाच्या ध्येयधोरणाबद्दल आपले काय मत आहे?
-विकासाचे ध्येय घेतलेल्या आणि कुटुंबाचा मोह त्यागून देशसेवा करणार्‍या पंतप्रधान मोदींसारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या हाती देशाची सत्ता आली आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला नक्कीच गती मिळणार आहे. कठोर परिश्रम, राष्ट्रसर्मपक भावना आणि नि:स्वार्थी सेवा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे देशास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, असा मला विश्‍वास आहे.

Web Title: Let your children learn from the medium of mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.