पंढरपूराला जाऊ चला, अकोलेकर भाविकांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या

By Atul.jaiswal | Published: June 16, 2023 04:35 PM2023-06-16T16:35:45+5:302023-06-16T16:36:32+5:30

मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०१२०५ नागपूर-मिरज ही विशेष गाडी रविवार, २५ जून व बुधवार, २८ जून रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी ८:५० वाजता रवाना होणार आहे.

Let's go to Pandharpur, three special train trains for Akolekar devotees | पंढरपूराला जाऊ चला, अकोलेकर भाविकांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या

पंढरपूराला जाऊ चला, अकोलेकर भाविकांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या

googlenewsNext

अकोला : आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी माथा टेकण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय म्हणून मध्य रेल्वेने नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर व अमरावती-पंढररपूर दरम्यान २५ ते २८ जून रोजी दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशा सहा फेऱ्या होणार असून, त्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकर भाविकांची सोय होणार आहे. याशिवाय खामगाव येथूनही एक विशेष रेल्वे गाडी पंढरपूरला सोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०१२०५ नागपूर-मिरज ही विशेष गाडी रविवार, २५ जून व बुधवार, २८ जून रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी ८:५० वाजता रवाना होणार आहे.

ही गाडी त्याच दिवशी दुपारी १३:२७ वाजता अकोला स्थानकावर येऊन १३:३० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०१२०६ मिरज-नागपूर ही विशेष गाडी सोमवार, २६ जून व गुरुवार, २९ जून रोजी मिरज स्थानकावरून दुपारी १२:५५ वाजता रवाना होऊन त्याच दिवशी दुपारी १५.५५ वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी सायंकाळी १७:०० वाजता पंढरपूर स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी सकाळी ७:१० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

नागपूर-पंढरपूर २६ व २९ ला -
गाडी क्र. ०१२०७ ही विशेष गाडी नागपूर येथून २६ व २९ जून रोजी सकाळी ८:५० वाजता रवाना होऊन त्याच दिवशी अकोला स्थानकावर १३:३७ वाजता येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०१२०८ ही विशेष गाडी पंढरपूर येथून २७ व ३० जून रोजी सायंकाळी १७:०० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ७:१० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

अमरावती-नागपूर २५ व २८ ला -
गाडी क्र. ०१११९ ही विशेष गाडी नवी अमरावती स्थानकावरून २५ व २८ जून रोजी दुपारी १४:४० वाजता रवाना होऊन त्याच दिवशी दुपारी १६:२० वाजता अकोला स्थानकावर येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:१० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०११२० ही विशेष गाडी २६ व २९ जून रोजी पंढरपूर स्थानकावर सायंकाळी १९:३० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०७ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

Web Title: Let's go to Pandharpur, three special train trains for Akolekar devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.