चला, नेत्रदानाचा संकल्प करू या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:14 AM2021-06-10T04:14:01+5:302021-06-10T04:14:01+5:30
जिल्ह्यातील नेत्रदान मोहीम २०१४ पासून नेत्रदानास सुरुवात ४०० पेक्षा जास्त नेत्रसंकलन १० हजारांपेक्षा जास्त नेत्रदानाचा संकल्प काय म्हणतात नेत्रतज्ज्ञ ...
जिल्ह्यातील नेत्रदान मोहीम
२०१४ पासून नेत्रदानास सुरुवात
४०० पेक्षा जास्त नेत्रसंकलन
१० हजारांपेक्षा जास्त नेत्रदानाचा संकल्प
काय म्हणतात नेत्रतज्ज्ञ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना येथील नेत्रपेढी बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातही मरणोत्तर नेत्रसंकलन बंद झाले आहे. कॉर्निया हा केवळ नेत्रदानातूनच मिळतो, मात्र सध्या नेत्रसंकलन शक्य नाही. असे असले तरी जागतिक नेत्रदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचा संकल्प आपण नक्कीच करू शकतो.
- डॉ. जुगल चिराणिया, नेत्रतज्ज्ञ, अकोला
नेत्रदान ठप्प पडले आहे. डोळ्यांतील कॉर्नियाचा भाग हा नेत्रदान मोहिमेतूनच उपलब्ध होऊ शकतो. मात्र, कोविडकाळात नेत्रदान मोहिमेला मोठा फटका बसला आहे. या काळात आपण नेत्रदान करू शकत नसलो, तरी त्यासाठी संकल्प नक्कीच करू शकतो. नागरिकांनी जागतिक नेत्रदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचा संकल्प करावा.
- डॉ. श्रीराम लाहोळे, नेत्रतज्ज्ञ