थातूरमातूर काम करू निकृष्ट बांधकाम लपविण्याचा प्रयत्न फसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:12+5:302021-04-26T04:16:12+5:30

लोकमतने २२ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर स्थानिक प्रशासन व कंत्राटदारांचे धाबे दणाणले. सावरगाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू ...

Let's try to hide the inferior construction to work in vain! | थातूरमातूर काम करू निकृष्ट बांधकाम लपविण्याचा प्रयत्न फसला!

थातूरमातूर काम करू निकृष्ट बांधकाम लपविण्याचा प्रयत्न फसला!

Next

लोकमतने २२ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर स्थानिक प्रशासन व कंत्राटदारांचे धाबे दणाणले. सावरगाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या तांडा वस्ती सभागृहाच्या निकृष्ट दर्जाचा बांधकाम लपवण्याचा कंत्राटदाराचा प्रयत्न फसला असून, सभागृहाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी झाल्याशिवाय पुढील काम करण्याचा ग्रामस्थांनी विरोध केला आहे. सावरगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव पी. पी. चव्हाण यांनी गेल्या सात वर्षांपासून ग्रामपंचायतचा संपूर्ण प्रभार दिला नाही. तसेच ते झरंडी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असून, ग्रामपंचायतला पाणी फाउंडेशनच्या मिळालेल्या १८ लाखांच्या पारितोषिक धनादेशाच्या रकमेमध्ये कुठल्याही प्रकारची कामे न करता सदर रकमेचा अपहार केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. तसेच सावरगाव येथील ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये सचिव शिवकुमार सरजे, सरपंच गजानन बलक यांनी लाखो रुपयांचा अपहार केला असून, काही कामे अर्धवट असूनसुद्धा देयके लाटण्यात आले. तसेच सावरगाव येथे जिल्हा परिषदमार्फत मंजूर झालेल्या १० लाखांच्या बंजारा समाजाचा सभागृहाच्या बांधकामामध्ये जुन्या विटा व रेतीऐवजी चुरीसह निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर, निकृष्ट बांधकाम लपविण्यासाठी कंत्राटदाराने रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टरद्वारे रेती बोलावून प्लास्टर करून लिपापोती करण्याचा प्रयत्न करण्यात केला. परंतु ग्रामस्थांनी विरोध करून बांधकामाची चौकशी झाल्याशिवाय पुढील काम करू न देण्याची अशी आक्रमक भूमिका घेतल्याने निकृष्ट बांधकाम लपविण्याचा कंत्राटदारांचा प्रयत्न फसला.

फोटो:

Web Title: Let's try to hide the inferior construction to work in vain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.