आयुर्वेदिक, युनानी औषधांच्या परवान्यांची हाेणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:21+5:302021-01-23T04:19:21+5:30

देशभरासह राज्यात मागील काही दिवसांपासून आयुर्वेदिक औषधांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये युनानी औषधींचाही समावेश आहे. आयुर्वेदिक, युनानी व ...

Licensing of Ayurvedic, Unani medicine licenses | आयुर्वेदिक, युनानी औषधांच्या परवान्यांची हाेणार तपासणी

आयुर्वेदिक, युनानी औषधांच्या परवान्यांची हाेणार तपासणी

Next

देशभरासह राज्यात मागील काही दिवसांपासून आयुर्वेदिक औषधांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये युनानी औषधींचाही समावेश आहे. आयुर्वेदिक, युनानी व सिद्ध औषधींचे उत्पादन करण्यासाठी अनेक कंपन्या कार्यरत आहेत. आयुर्वेदिक औषधीच्या मागणीत वाढ झाल्याने त्यांचे पेटंट मिळविण्याकडे ओढा वाढत चालला आहे. पेटंट मिळविलेल्या औषधींचे उत्पादन करणे व त्यांची बाजारात विक्री करण्यासाठी परवाना देणे किंवा परवान्यांच्या नूतनीकरणीकरणासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली हाेती. या समितीमध्ये नव्याने फेररचना करण्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर हालचाली सुरू हाेत्या. परवाना देणे, त्याचे नूतणीकरण तपासणे व या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने चारसदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आयुष संचालनालयाचे संचालक अध्यक्षस्थानी असून इतर तीन तज्ज्ञांचा सदस्यपदी समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Licensing of Ayurvedic, Unani medicine licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.