चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या वृध्दास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 06:52 PM2021-09-21T18:52:12+5:302021-09-21T18:54:24+5:30
Life imprisonment : ७८ वर्षीय वृध्दास पाेस्काेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही़ डी़ पिंपळकर यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली़
अकाेला : मुर्तीजापूर तालुक्यातील माना पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हीवरा काेरडे येथील रहीवासी असलेल्या एका चार वर्ष सहा महीन्यांच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या ७८ वर्षीय वृध्दास पाेस्काेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही़ डी़ पिंपळकर यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ यासाेबतच दाेन लाख ५० हजार रुपयांचा दंडही ठाेठावला असून दंड न भरल्यास अतीरीक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे़. न्यायालयाने हा निकाल मंगळवारी दिला़हीवरा काेरडे येथील रहीवासी असलेला नराधम वृध्द आराेपी विठ्ठल माेराती पारीसे वय ७८ वर्ष याने याच गावातील रहीवासी असलेल्या व त्यावेळी केवळ ४ वर्ष सहा महीने वय असलेल्या अल्पवयीन चिमुकल्यावर २४ जुलै २०१९ राेजी अनैसर्गिक अत्याचार केले हाेते़. दाेन दिवसांपासून मुलाची मनस्थीती याेग्य नसल्याचे तसेच शारीरीक इजा हाेत असल्याचे मुलाच्या आइच्या लक्षात आले़. यावरुन मुलाच्या आइने त्याची विचारपुस केली असता सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या मुलाने त्याच्यासाेब घडलेला संपुर्ण प्रकार आइला सांगीतला़. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार माना पाेलिस ठाण्यात देताच पाेलिसांनी आराेपी विठ्ठल पारीसे याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ व पाेस्काे कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता़. त्यानंतर या प्रकरणाचा तपास माना पाेलिस स्टेशनचे तत्कालीन पाेलीस उपनिरीक्षक विजय महाले यांनी करून दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले़. पाेस्काे कायद्याच्या विशेष न्यायालयाने साक्षीदार तपासल्यानंतर वृध्द नराधम आराेपी विठ्ठल पारीसे यास दाेषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़. यासाेबतच दाेन लाख ५० हजार रुपयांचा दंड ठाेठावला असून दंड न भरल्यास अतीरीक्त सहा महीन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे़ या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने अॅड मंगला पांडे यांनी कामकाज पाहीले़ तर काेर्ट पैरवी अधिकारी म्हणूण विजय विल्हेकर व प्रवीण पाटील यांनी कामकाज पाहीले़.