‘हे जीवन एक लढाई, कधी हिंमत हारायची नाही!’
By Admin | Published: February 17, 2016 02:19 AM2016-02-17T02:19:04+5:302016-02-17T02:33:58+5:30
ग्रंथोत्सवातील कविसंमेलनात उमटली शेतक-यांची व्यथा.
अकोला: शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मंगळवारी दुपारी ३ वाजता कविसंमेलन पार पडले. वैदर्भीय शेतकर्यांचे दु:ख म्हणजे एक लढाई असून, ती जिंकण्यासाठी हिंमत न हारण्याचे आवाहन करणारी कविता किशोर बळी यांनी सादर करून वैदर्भीय शेतकर्यांची सद्यस्थिती मांडली. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाचकवडे होते. व्यासपीठावर उपस्थित अरविंद भोंडे, राजेश दांगटे, सुरेश पाचकवडे, रवींद्र महल्ले व पोहेकर यांनी आपल्या विविध रचना सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना भारावून सोडले. यावेळी राजेश दांगटे यांनी ह्यशांताबाईह्ण व ह्यपुस्तकांचे झाडह्ण या दोन काव्यरचना सादर केल्या, तर ग्रंथालयाचे कर्मचारी पोहेकर यांनी ह्यग्रंथालयात तुम्ही बसून पाहा, पुस्तकाच्या सान्निध्यात जगून पाहा.ह्ण व ह्यहुंडाह्ण या ज्वलंत विषयावर कविता सादर केल्या. अरविंद भोंडे यांनी अनेक विनोदी किस्से सांगून उपस्थितांना खळाळून हसविले तसेच ह्यराम-रहीम एक आहे, सारे जण म्हणतात..ह्ण ही देशभक्तीचा संदेश देणारी रचना सादर केली. रवींद्र म्हल्ले यांनी ग्रामीण भागातील सत्यस्थितीचे वर्णन करणारी वर्हाडी कविता सादर करून रसिकांना हेलावून सोडले. सुरेश पाचकवडे यांनी ह्यदहशतह्ण आणि ह्यदगडह्ण या दोन काव्यरचना सादर केल्या. बहारदार सूत्रसंचालन करताना बळी यांनी ह्यकसं सांगू तुले सावित्रीबाई फुले..ह्ण ही कविता सादर करून, विसंगती, अतिशयोक्ती व अपेक्षाभंगातून कसे विनोदी किस्से घडतात, हे सांगत अनेक किश्श्यांद्वारे रसिक श्रोत्यांना खळखळून हसविले. कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.