कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गुरांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:18 AM2021-04-09T04:18:42+5:302021-04-09T04:18:42+5:30

लॉकडाऊन असल्याने, अंधाराचा फायदा घेत रात्री अंदाजे २०-२५ गुरांना कत्तलीकरिता पायदळ नेण्यात येत असल्याची माहिती अकोट शहर पोलिसांना मिळाली. ...

Life saving for cattle taken for slaughter | कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गुरांना जीवनदान

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गुरांना जीवनदान

Next

लॉकडाऊन असल्याने, अंधाराचा फायदा घेत रात्री अंदाजे २०-२५ गुरांना कत्तलीकरिता पायदळ नेण्यात येत असल्याची माहिती अकोट शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे अंजनगाव रोड परिसरात पोलिसांनी ही जनावरे पकडली. जनावरांशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली असता, गुरांना नेणाऱ्या व्यक्तीकडे कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे कत्तलीकरिता नेण्यात येणारे लाखो रुपयांचे गोधन जप्त करण्यात आले. जनावरे घेऊन जाणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पायदळ जनावराची वाहतूक करणारे रोजंदारीवरील मजूर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोधन तस्करीचा खरा सूत्रधार कोण,जनावरे कुठून आणली, कत्तलीसाठी कोणत्या ठिकाणावर नेण्या येत होती? आदी प्रश्नांचा उलगडा पोलीस तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले करीत आहेत.

Web Title: Life saving for cattle taken for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.