कत्तलीसाठी नेत असलेल्या सहा गोवंशांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:16 AM2021-07-17T04:16:20+5:302021-07-17T04:16:20+5:30
मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बीडगाव चेकपोस्टवर एका मालवाहू वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करीत असलेल्या सहा ...
मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बीडगाव चेकपोस्टवर एका मालवाहू वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करीत असलेल्या सहा गोवंशांना ग्रामीण पोलिसांनी जीवनदान दिल्याची कारवाई शुक्रवारी दुपारी ३ वाजता केली.
अंजनगाव येथून कारंजाकडे एका मिनी मालवाहूमधून निर्दयपणे बांधून ठेवलेल्या जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती बीडगाव चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या हेड कॉन्स्टेबल गजानन थाटे यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने संशयित मिनी मालवाहू वाहन (क्र. एमएच २७ एक्स ४२३६) अडविले. तपासणी केली असता वाहनात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेले सहा गुरे ताडपत्रीने झाकून
ठेवलेले निदर्शनास आले. याप्रकरणी संशयित आरोपी पंजाब गवई (४२) (रा. हयातपूर बेलोरा, ता. अंजनगाव), बाबूराव आठवले (३७) (रा. मलकापूर तरोळा, ता. अंजनगाव) यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन व १ लाख रुपये किमतीची जनावरे असा २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हीकारवाई ठाणेदार रहिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गजानन थाटे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन सयाम, फिरोज व विनोद यांनी केली.