अकोली जहाँगीरच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला  जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:40 AM2017-09-09T01:40:44+5:302017-09-09T01:44:28+5:30

अकोट : अकोट तालुक्यातील अकोली जहाँगीर येथील  शेतशिवारात असलेल्या कोरड्या विहिरीत पडलेल्या  बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाच्या अमरावती येथील  बचाव पथकाने ८ सप्टेंबर रोजी अथक परिश्रम घेऊन  बाहेर काढून जीवनदान दिले. 

Lifetime of leopard lying in the well of Akoli Jahangir | अकोली जहाँगीरच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला  जीवनदान

अकोली जहाँगीरच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला  जीवनदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट तालुक्यातील अकोली जहाँगीर येथील  शेतशिवारात असलेल्या कोरड्या विहिरीत पडलेल्या  बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाच्या अमरावती येथील  बचाव पथकाने ८ सप्टेंबर रोजी अथक परिश्रम घेऊन  बाहेर काढून जीवनदान दिले. 
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानूर वनपरिक्षेत्र  बीटमध्ये अकोली जहाँगीर येथील शंकर वाळके यांच्या  शेतातील कोरड्या विहिरीत ७ सप्टेंबर रोजी बिबट  पडल्याची माहिती मिळाली. प्रारंभी गावकर्‍यांनी व  अकोला, अकोट वन्य जीव विभागाच्या अधिकारी,  कर्मचार्‍यांनी त्याला बाहेर काढण्याकरिता विविध प्रयत्न  केले; परंतु बिबट्याचे छोटे पिल्लू असल्याने त्याला  सुखरूप बाहेर काढणे अवघड होते. खाट विहिरीमध्ये  सोडल्यावरही बिबटचे पिल्लू त्यावर बसत नसल्याने   शेवटी अमरावती येथील बचाव पथकाला बोलाविण्या त आले. या पथकाने विहिरीमध्ये जाळे टाकून व विविध  क्लृप्त्या वापरुन १२ तासांच्या अथक परिश्रमानंतर या  बिबट्याला ८ सप्टेंबर रोजी बाहेर काढून पिंजर्‍यात बंद  केले. या कामी अमरावती बचाव पथकाचे राउंड  ऑफीसर अजय बावणे, आर.एफ.ओ. वाजगे,  अकोला वन विभागाचे डीएफओ लोणकर, अमरावती  उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, अकोला ए.सी.एफ.  सोनोने, अकोला आर.एफ.ओ.अशोक वायाळ, राउंड  ऑफीस प्रकाश गीते, वनरक्षक सरिता राऊत, धनंजय  सुरुशे,  मानद वन्य जीव संरक्षक बाळ काळणे, शेख  मुन्ना यांच्यासह गावकर्‍यांनी सहकार्य केले. बिबट्याचे  पिल्लू बाहेर काढल्यानंतर लोखंडी पिंजर्‍यात बंद करण्या त आले. त्यानंतर अकोट येथील वन्य जीव विभागात  हा पिंजरा आणण्यात आला. सदर बिबट्यावर वैद्यकीय  उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात  येणार असल्याचे वन अधिकार्‍यांनी सांगितले. 

Web Title: Lifetime of leopard lying in the well of Akoli Jahangir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.