पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन 

By राजेश शेगोकार | Published: March 14, 2023 04:21 PM2023-03-14T16:21:23+5:302023-03-14T16:27:07+5:30

विधान भवनाच्या प्रांगणात आमदार नितीन देशमुख आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ  ६९ खेडेगावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत. 

Lift moratorium on water reservation 69 villages villagers protest | पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन 

पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन 

googlenewsNext


अकोला : महाराष्ट्र जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ६९ खेडीगाव पाणीपुरवठा योजनेचे आतापर्यंत ५० टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे. मात्र, तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वान धरणातून पाणी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती सोमवारी न हटविल्यामुळे १४ मार्च मंगळवारी मुंबई येथे विधान भवनाच्या प्रांगणात आमदार नितीन देशमुख आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ  ६९ खेडेगावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिंदे- फडणवीस सरकारच्या निर्णयाचा विरोध करत अकोल्यातील 69 गावांसाठी प्रस्तावित असणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला दिलेल्या स्थगितीविराेधात ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले यावेळी  शिवसेनेच्या नेत़ृत्त्वात होत असलेल्या आंदोलनात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. या आंदाेलनाच्या मंडपात शिवसेनेच्या अनेक नेत्यांसह गावागावातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी याेजनेच्या बाजुने आक्रमकपणे भूमिका मांडल्या. 

  बाळापूर व अकाेला तालुक्यात पाणी टंचाई निर्माण हाेते.यासाठी जीवन मिशनअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. या योजनेत जल बाळापूर तालुक्यातील 53 गावे, अकोला तालुक्यातील 16 गावे अशा एकूण 69 गावांचा समावेश आहे.

ठाकरे सरकारच्या काळात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषद गट नेते गाेपाल दातकर यांच्यासह या दाेन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात अनेक बैठका झाल्या. त्यानंतर तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात या याेजनेला सर्व मान्यता प्रदान करून निधीही मंजूर करण्यात आला. मात्र, आता पालकमंत्री स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याेजनेसाठीच्या पाण्याचे आराक्षण स्थगित ठेवण्याचा आदेश दिल्याने ६९ गावातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या धरणे आंदाेलनात जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, सेवकराम ताथोड, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, अतुल पवनीकर, शहरप्रमुख राहुल कराळे, योगेश्वर वानखडे, उमेश भुसारी, बबलु देशमुख, उमेश जाधव, ज्ञानेश्वर म्हैसने, बाळासाहेब लांडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी काॅंग्रसेचे प्रदेश प्रवक्ते डाॅ. सुधीर ढाेणे यांनीही आंदाेलनात सहभागी हाेत ग्रामस्थांना पाठींबा दिला.
 

Web Title: Lift moratorium on water reservation 69 villages villagers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.